Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मराठी साहित्य संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना.अनिल पाटील मैदानात

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

बालगंधर्व महोत्सवात अभंग, रागा फ्युजन बँडद्वारे स्वरांची अनुभूती

मराठी साहित्य संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना.अनिल पाटील मैदानात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 6, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व पोलीस बंदोबस्ताचा घेतला आढावा आढावा

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव)। ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात जावून युवक-युवतींशी संवाद साधला. तरुणाईला साहित्य संमेलनात माहिती व ज्ञानाचा खजिना मिळेल. जो भविष्यात त्यांच्या कामी येईल, अशा शब्दात त्यांनी तरुणाईला साद घातली.

संमेलनाच्या तयारी संदर्भात मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपूर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली. त्यानंतर तयारी कुठपर्यंत आली, आता कोणती कामे शिल्लक आहेत याची माहिती जाणून घेतली तसेच मदतीसाठी सेवेकरी, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक नेमणूक याबाबत सविस्तर चर्चा केली आणि काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या.

मराठी साहित्य संमेलनासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत संमेलनाच्या तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा आदी सूचना ना.पाटील यांनी दिल्या. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी व म.वा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण स्थळाची पाहणी केली. यावेळी काही बदल देखील त्यांनी सुचविले. दरम्यान या पाहणी दरम्यान मंत्री पाटील यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवतींशी संवाद साधत त्यांच्यात संमेलनाबाबत उत्सुकता देखील वाढवली.

सदर बैठकीत प्रांतधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, तहसीलदार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, खा.शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता, मंडळाचे शरद सोनवणे, संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, श्यामकांत भदाणे, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रा शिला पाटील, स्नेहा एकतारे, प्राचार्य डॉ ए. बी. जैन यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: agro tourismamalnerIndia TourismjalgaonJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In