
हरिश्चंद्रगड आज ३१ डिसेंबरला पर्यटकांसाठी बंद
अकोले l नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वागताच्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हरिश्चंद्रगड ३१ डिसेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय अकोले तालुक्याच्या पाचनई गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
पर्यटकांना या प्रसंगी माहिती मिळावी म्हणून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्टर्समध्ये म्हटले आहे की, ३१ डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगड बंद राहणार आहे.
हरिश्चंद्रगड परिसरात जबरदस्ती प्रवेश केल्यास पर्यटकांना ५००० रुपये दंड आकारण्यात येईल. नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेकजण मद्य आणि अमली पदार्थाचे देखील सेवन करतात त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
