Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा

गुवाहाटी येथे आयोजित पहिल्या आशियाई रेंजर्स फोरमच्या उद्घाटन

राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच... उपमुख्यमंत्री फडणवीस

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 8, 2023
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले – साहित्यिक वा.ना. आंधळे

जळगाव l ‘बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनात कर्तृत्वाला स्थान दिले. प्रतिकुलतेत देखील केवळ कर्तृत्वाच्या जोरावर आनंदाने जगत, काव्य निर्मिती करत राहिल्या हे खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक वा.ना. आंधळे यांनी केले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त दिनानाथ चौधरी, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह वाड्यातील नागरीक उपस्थित होते.बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. आंधळे व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले गेले.

बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वा.ना. आंधळे यांचे पुस्तक व सुतीहार देऊन हृद्य स्वागत केले. लेवा गणबोली दिनाच्या औचित्याने कवयित्री शीतल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लेवा गणबोली व मराठीच्या इतर भागांमध्ये बोलण्यात येणाऱ्या भाषा या बहिणी बहिणी आहेत. त्या त्या भागाची ओळखच या बोली भाषा देत असतात. या सर्व बोली भाषा जीवंत कशा असतील याबाबत विचार करायला हवा. बहिणाबाई शिवाय लेवागणबोली ही पूर्ण होऊच शकत नाही असे अस्सल लेवा गणबोलीतून त्यांनी मनोगत व्यक्त केले.

जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी कवयित्री ज्योती राणे, शीतल शांताराम पाटील तसेच अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पाटील, सोनार, वाघ, गाजल चौधरी, पायल चौधरी, अशोक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास नातसून पद्माबाई चौधरी, पणती सून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, परिवारातील व चौधरी वाड्यातील नागरीक यांसह सौ. सुनंदा चौधरी शोभा चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, देवेश, शारदा, कोकिळा, दिपाली प्रिया, कविता चौधरी तसेच सुभाष मराठी, ईश्वर राणा, भानुदास नांदेडकर यांची उपस्थिती होती. ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांच्या नियोजनात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Tags: agro tourismBahinabaiIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In