Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘खान्देश रन-२०२३’ उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियन्स सेंटरच्या भूमिपूजन

सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा २०२४

‘खान्देश रन-२०२३’ उत्स्फूर्त प्रतिसाद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 3, 2023
403 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

जळगाव l जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन-२०२३’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे सुमारे १४०० सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी २१, १०, ५ आणि ३ कि.मी. असे गट होते. सकाळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह डॉ.प्रीती अग्रवाल, बच्छाव सर यांनी झेंडी दाखवून ३ कि.मी. रन आरंभ झाला.

यात विशेषतः महिला सहकाऱ्यांचा विशेष सहभाग दिसून आला. खान्देश रन महोत्सवाचे हे सातवे वर्ष होय. आरंभी ‘खान्देश रन’च्या ७ व्या मॅरेथॉनची २१ किलोमीटर गटाची पहाटे साडे पाच वाजता सुरूवात झाली. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, टिश्यू कल्चर पार्क टाकरखेडा, जैन एग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूड पार्क, डिव्हाईन पार्क मधील सहकारी, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती स्कूल प्रायमरी, अनुभूती स्कूल सेकंडरी मधील विद्यार्थी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी, भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाउंडेशन सहकारी, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्साहाने खान्देश रन महोत्सवात सहभाग घेतला.

खान्देश रन मध्ये नोंदणी झालेल्या एकूण संख्येपैकी ४० टक्के सहकारी हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड चे होते हे विशेष. यात वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते.

कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये, त्याचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग होत, निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी, यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सहकाऱ्यांना या रन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते.

Tags: agro tourismIndia TourismJalgaon TourismKhandesh Runkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In