Wednesday, August 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जागतिक सागरी शिखर परिषदेस मुंबईत प्रारंभ

म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणे कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व

राज्याला लाभलेल्या सागरी किनाऱ्यामुळे या क्षेत्राच्या विकासाच्या अनेक संधी

जागतिक सागरी शिखर परिषदेस मुंबईत प्रारंभ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 17, 2023
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे परिषदेचे उद्घाटन

मुंबई l जागतिक सागरी शिखर परिषद 17 ते 19 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मुंबई येथे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 9-30 वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या परिषदेचे उद्घाटन केले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्याचे बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर ही परिषद होत आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील बंदरे विकासासंदर्भातही विशेष चर्चासत्र होणार आहे.

मुंबईत होणारी ही जागतिक सागरी शिखर परिषद राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई बंदरास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, देशाच्या सागरी विकासाला चालना देणाऱ्या धोरणा संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन याशिवाय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्धाटन यावेळी करण्यात येणार आहे.

राज्याच्या बंदर विकासासंदर्भात चर्चासत्र राज्यातील बंदरे विकास, परिवहन, उद्योग, पर्यटन क्षेत्रातील वाटचालीसंदर्भात मंगळवारी दुपारी 2 ते 3-30 या दरम्यान चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री श्री. बनसोडे हे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उद्योग व खनिकर्म विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, बंदरे विकास आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.

महाराष्ट्राचे विशेष पॅव्हेलियन – राज्यातील बंदरांचा विकास, पर्यटन क्षेत्रातील संधी आणि उद्योग क्षेत्राची भरारी यासंदर्भातील माहिती देणारे विशेष पॅव्हेलियन या सागरी शिखर परिषदेत असणार आहे….. द्वारा: दीपक चव्हाण

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In