Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सप्तश्रृंगी गड परिसरात भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटन वाढीच्या दृष्टीने विकास होणार

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं

दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता

सप्तश्रृंगी गड परिसरात भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटन वाढीच्या दृष्टीने विकास होणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 7, 2023
404 4
0
561
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सप्तश्रृंगी गडाच्या ८१ कोटी ८६ लाखांच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी देणार… उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा): कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखांच्या पर्यटन विकास आराखड्यास शासन स्तरावर मंजुरी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार सुनिल तटकरे, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितिन पवार, हिरामण खोसकर, डॉ. रावसाहेब शिंदे, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, नगराध्यक्ष कौतिक पगार, माजी जि.प. अध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखांच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजुरी देण्यात येऊन आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देऊन कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील ४९४ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातील. कळवण व सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी योवळी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अश्वासनाचे स्वागत आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या विकास कामे, वनपट्टे प्रश्न यावर सकारात्मक भूमिका शासनस्तरावर घेण्यात यावी अशा भावना यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार नितिन पवार यांनी आपल्या मनोगतात कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच भविष्यात करावयाच्या कामांना शासनस्तरावर मंजुरी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Tags: India TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismSaptshrungi Devi
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In