Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शानदार नृत्याविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

पुणे फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

शानदार नृत्याविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 24, 2023
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गायन, ओडिसी नृत्य आणि लोकवाद्यांच्या सुरांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे l कथ्थक कलाकार  नंदकिशोर कपोते, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर सुरेश शर्मा, ओडिसी नृत्यांगना पार्वती दत्ता, सुगंधा दाते, सीमा कालबेलिया लोककलाकार गाजी खान यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृह येथे आयोजित  प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  या नृत्याविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. नृत्य पथकाने मंगलाचरणातील शिव स्तुतीच्या सादरीकरणाच्या माध्यमातून भगवान शंकराला वंदन केले.  पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दशावतार, रामायण, पल्लवी आणि मोक्षाचे अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

सारेगामा लिटिल चॅम्पस्  २०१९ च्या विजेत्या सुगंधा दाते यांनी मराठी अभंग आणि हिंदी चित्रपट गीते सादर केली.

प्रेक्षक लोकझंकारच्या तालावर नाचले – आठ राज्यातील लोककलाकारांच्या लोकझंकाराच्या सादरीकरणाने रसिकांना लोकसंगीताचा तालावर ठेका धरायला भाग पाडले.  झंकारमधील लोकगायन, वाद्य, नृत्याच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली. लोककलाकारांनी सादर केलेले पारंपरिक कालबेलिया नृत्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले.  या सर्पमित्र नृत्याच्या प्रत्येक अविष्काराने, तालाने आणि सुरांनी एक वेगळेच वातावरण निर्माण केले.  यासोबतच घुम-चक्कर या सादरीकरणानेही प्रेक्षकांची मने जिंकली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्मी पब्लिक स्कूलच्या ५० विद्यार्थी यानी  गोंड, वारली आणि मण्डाणा च्या नामवंत कलाकारांकडून प्रशिक्षण घेऊन चित्राविष्कार सादर केला.

शनिवारी मधुरा दातार यांची संगीत मैफल

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथील कला शाखेचे विद्यार्थी कथ्थक नृत्य सादर करतील.  तसेच प्रसिद्ध गायिका मधुरा दातार गीते सादर करणार आहेत. पुण्यातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to visit near punePune Tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In