Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत आहे कलाग्राम प्रकल्प

पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची ११, १२ व १३ सप्टेंबर रोजी विशेष मुलाखत

कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत आहे कलाग्राम प्रकल्प

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 9, 2023
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत… मंत्री छगन भुजबळ

नाशिक l कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाची मंत्री भुजबळ यांनी आज पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, अभियंता महेश बागुल, पर्यटन विभागाचे उप अभियंता ज्ञानेश्वर पवार, गोवर्धन गावचे सरपंच बाळासाहेब लांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, कलाग्राम प्रकल्पाचे काम हे त्वरीत पुर्ण करण्यात यावे. सद्यस्थितीत येथे बांधण्यात आलेल्या दुकानांचे अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण करणे, पथदिवे बसविणे त्याचप्रमाणे दुकानांना शटर, दरवाजे, खिडक्या बसविण्याची कामे सुरू करण्यात यावीत. कलाग्राम येथील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, उपहागृह व प्रसाधन गृह येथे आवश्यक असलेली प्लंबिंगची कामे, वाहनतळ पार्कींग व्यवस्था ही कामे दर्जात्मक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कलाग्रामच्या बाह्य बाजुस बाग-बगिचा व परिसर सुशोभिकरण करणे यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी पार्क तयार करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी भुजबळ यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर आणि अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूटच्या कामांचाही आढावा घेतला. बोटक्लब नाशिक येथे 1 हजार अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर बांधण्यात येत असून यात पहिल्या टप्प्यात 600 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असा 1 हॉल, 200 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे 2 हॉल, ऍप्मीथिअटर, उपहारगृह, प्रसाधान गृह, केंद्रीकृत वातुनूकुलित यंत्र, प्रोजेक्टर वीथ साउंड सिस्टीम ही कामे पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली.

तसेच दुसऱ्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाखनिधीतून अंतर्गत फर्निचर व सजावट, वाहनतळाची व्यवस्था बाह्य बाजूस बाग-बगीचा व सुशोभिकरण करणे, पथ दिवे आणि अंतर्गत रस्ते यांची कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट सूरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत भुजबळ यांनी निर्देश दिले.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNashik tourismnasik
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In