Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

नारी शक्तीला प्रोत्साहन l महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी

उत्कृष्ट परसबागा निर्मितीसाठी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन

मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 6, 2023
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना l उद्योगपती आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर, सचिन पिळगावकर, मधुर भांडारकर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग… पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई l मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मंत्री श्री. महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती श्री. महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबईसह राज्यातील पर्यटनाच्या वृध्दीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. यानिमित्त मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी श्री. महिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय या फाऊंडेशनमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते सचिन पिळगावकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे.

देश- विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई शहराचा इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, खरेदी, चित्रपटसृष्टी, संगीत, कला, क्रीडाविषयक माहिती पर्यटकांना देण्यात येईल. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराला मदत होईल. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या कालावधीत देश- विदेशातील पर्यटक मुंबईसह राज्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे पर्यटनासह पर्यटनावर आधारित व्यवसायांचा विस्तार होईल, असाही विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmumbaiMumbai tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In