Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहणार

हिरवाई अन निळाई जगलेले…’ तून महाकवींच्या हृदय आठवणी

"हिरवाई अन् निळाई जगलेले ना.धों. महानोर

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 28, 2023
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीमंत शाहू महाराजांच्या सूचना लक्षात घेवून पुरातत्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून पुर्वीचा अंबाबाई मंदिर परिसर उभा केला जाणार ….पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर l जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, सामाजिक विषयाशी निगडीत जुन्या वास्तू व ठिकाणांची शासनस्तरावरुन विविध कामांतून दुरुस्ती, डागडूजी सुरु आहे. पुर्वीच्या आहे त्या स्थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्या पध्दतीने ऐतिहासिक वारसा असलेलं, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेलं कोल्हापूर पून्हा एकदा त्याच प्रकारे येत्या काळात उभं करणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर येथे केले.

मंदिर परिसरातील भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारत येथे उभारण्यात आलेले स्वच्छतागृह व दक्षिण दरवाजा नजिक वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत भवानी मंडप जवळ हुजूर पागा येथील स्वच्छतागृह 83 लाख 8 हजार रुपयांच्या निधीतून तर दक्षिण दरवाजा येथील चप्पल स्टॅण्ड सुविधा केंद्र 11 लाख 78 हजार रुपयांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

गर्दीचे दिवस वगळून मंगळवार पासून भाविकांना गाभाऱ्यातून श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मंदिर परिसरातील कामांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात भूमिगत पद्धतीने विद्यूत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार आहे. मंदिर परिसरातील माहिती केंद्र पागा इमारतीत हलविले जाणार आहे. श्रीमंत शाहू महाराजांच्या सूचना घेवून पुरातत्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून पुर्वीचा मंदिर परिसर उभा केला जाणार आहे. पागा इमारतीमध्ये सुविधा निर्माण करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद घेतले आहेत. मंदिर परिसरात कामांची गती संथ असण्याचे कारण गुणवत्ता व तज्ज्ञ व्यक्तींची मदत हे आहे. सर्व कामे चांगली व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्न करत असून येत्या काळात कोल्हापूरला निश्चितच चांगली झळाळी प्राप्त होईल, असे ते पुढे म्हणाले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवरांनी सोबत श्री महालक्ष्मी, अतिबलेश्वर, छत्रपती शाहू महाराज राजमहालातील श्री तुळजाभवानीचे दर्शन घेवून मंदिर परिसर व भवानी मंडपाची पाहणी केली.

Tags: agro tourismIndia TourismKolhapurKolhapur jungle safariKolhapur TourismMahalakshmi MandirmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In