Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
वांद्रे किल्ला (Bandra Fort) ते माहीम किल्ला (Mahim Fort) बोर्ड वॉक (Board Walk) ठरणार मुंबईतील नवीन आकर्षण

English Movie - Marleshwar Cave Temple

श्री क्षेत्र पद्मालय गणपती, एरंडोल, जिल्हा जळगाव

वांद्रे किल्ला (Bandra Fort) ते माहीम किल्ला (Mahim Fort) बोर्ड वॉक (Board Walk) ठरणार मुंबईतील नवीन आकर्षण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 27, 2021
403 26
1
589
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, प्रतिनिधी। मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प (Cycle Track Project) हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असून विविध धर्मीय स्थळांनादेखील तो जोडणारा ठरेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thakarey) यांनी आज संबंधीत यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.

श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर, उजव्या आणि डाव्या सोंडेच्या मूर्ती एकाच सिंहासनावर विराजमान गणेश मंदिराच्या माहितीसाठी लिंक क्लिक करा

या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल (२६ एप्रिल) आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सैनी, महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बैठकीत सहभागी झाले होते.

प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित आगरकरांची कोकणातील वाडी तुम्ही पहिली आहे का……. व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा

प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे ४.७७ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरेल.

वरदहस्त शक्तीपीठ – श्री पाटणादेवी मंदिर, चाळीसगाव….. व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा

स्तावित बोर्ड वॉकचा अंतिम आराखडा आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, प्राथमिक संकल्पनेवर सर्व संबंधीत यंत्रणांनी चर्चा करुन आपापल्या अखत्यारितील मुद्यांविषयी स्पष्टता करावी. जेणेकरून, अंतिम आराखडा तयार करताना त्यांचा समावेश करता येईल. या प्रकल्पाची बांधणी करताना माहीम कोळीवाडा वसाहतीला तसेच तेथील मच्छीमार बांधवांच्या बोटींना कोणताही अडथळा ठरणार नाही यादृष्टीने हा बोर्ड वॉक बांधण्यात येईल. त्यासोबत वांद्रे-वरळी सागरी सेतू आंतरमार्ग बदलाच्या ठिकाणी (इंटरचेंज) देखील बोर्ड वॉकला अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण विचार करून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सूचना केल्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल, असे ते म्हणाले.

श्री शिव समर्थ गढ, डेरवण – श्री संत सितारामबुवा वालावलकर समाधी मंदिर…. व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा
Tags: aditya thakreBandra Fort to Mahim Fort Board WalkBoard WalkCycle Track Projectfamous gansesh temple jalgaonganaptiGaneshmaharashtra DGIPRmaharashtra tourism departmentबोर्ड वॉक
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Comments 1

  1. HincHots says:
    5 years ago

    In it something is. I agree with you, thanks for an explanation. As always all ingenious is simple.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In