Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शिवाई देवराईचे शिवनेरीवर उद्घाटन

चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

शिवाई देवराईचे शिवनेरीवर उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 24, 2023
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जुन्नर वन विभागातील १०० वी देवराई

वनविभाग, जैन ठिबक, सह्याद्री गिरिभ्रमणचा पुढाकार

जुन्नर – जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम साऱ्या जगाला भेडसावत आहेत. हि समस्या वेळीच रोखण्यासाठी वृक्षांचे आच्छादन पृथ्वीवर तयार झाले पाहिजे. यासाठी स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाहीत, तर जनजागृती आणि पर्यावरण आणि गड किल्ले संवर्धनासाठी संवेदनशिल पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. या उद्देशाने सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पाठपुराव्यातून आणि जैन ठिबक उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व भावनेतून दिलेल्या २५ लाख रुपयांच्या योगदानातून जुन्नर वनविभाग किल्ले शिवनेरीवर शिवाई देवराई विकसित केली आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. यावेळी ९० प्रजातींची ३०० दुर्मिळ झाडे या देवराईत लावण्यात आली.

सातपुते यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२४) शिवाई देवराई चा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला. शिवाई देवराईचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जैन ठिबक उद्योग समूहाचे रवी गाडीवान, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री, उपाध्यक्ष राहुल जोशी, कृष्णा देशमुख, सहाय्यक उपवनसंरक्षक अमित भिसे, संदेश पाटील, शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे, विश्वस्त प्रकाश ताजणे, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शिवाजी ट्रेलचे विनायक खोत, स्वराज्य पर्यटन संस्थेचे विजय कोल्हे, पुरातत्त्व विभागाचे गोकूळ दाभाडे, प्रा.विनायक लोखंडे, प्रा.संदीप खिलारी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सातपुते म्हणाले,‘‘ जुन्नर वनविभागात ९९ देवराया आहेत. शिवनेरीवरील हि देवराई शंभरावी (शताब्दी) शिवाई देवराई म्हणून यापुढे ओळखली जाईल. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी केवळ कायदे नियम करून ती जगवता येत नाहीत. तर झाडांना देवाच्या श्रद्धेच्या रुपात पाहिल्याने, तसेच त्यांचा संदर्भ देव धर्माशी जोडल्याने, जोपासना करण्याची वृत्ती माणसात खऱ्या अर्थाने निर्माण होते. यातून पर्यावरणाबाबत संवेदनशिल पिढी निर्माण होते. या संवेदनशिलेतेतुन ‘शिवाई’ देवराईतील वृक्षे जोपासली जातील.

‘‘दरम्यान यावेळी आपला सलूनचा व्यवसाय सांभाळत ३००० झाडांचे संगोपन करणारे वनश्री पुरस्कार विजेते जालिंदर कोरडे, बेल्हे येथे घनवन विकसित करणारे गणपत औटी,तसेच जुन्नर तालुक्यातील वनसंपदेवर संशोधन करणारे वनस्पतीशास्र्ताचे संशोधक दांपत्य डॉ.सविता रहांगडाळे आणि संजय रहांगडाळे यांचा वनसंपदेच्या विश्वात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

यावेळी वनविभागाच्या बगीचांमध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभाग तसेच वनस्पतिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी मानले.

सह्याद्रीचे अध्यक्ष संजय खत्री यांनी देवराई उभारणी मागची संकल्पना सांगितली. चौकट म्हणून शिवाई देवराई नामकरणप्रत्येक गड किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी त्या किल्ल्याच्या नावाने देवराई उभारण्यात यावी या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या संकल्पनेतुन देवराई साकारत आहे. मात्र बहुतांश देवराई या मातृसत्ताक नावाने असल्याने शिवनेरी देवराई हि शिवाई देवराईने ओळखली जावी अशी संकल्पना वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.सविता रहांगडले यांनी मांडली. त्यांच्या संकल्पनेनुसार जुन्नरमधील १०० वी देवराई शिवाई देवराई नावाने संबोधण्यात येईल अशी घोषणा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यवेळी केली.

Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJain HillsMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In