Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी-२० परिषदेत प्रदर्शन

विदेशातील अतिथी यांना भावला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 31, 2023
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर

अमरावती l जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.

‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismबाघमेळघाट
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In