Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात ‘एमटीडीसी’चे दालन

'सत्यमेव जयते फार्मर कप 2022' पुरस्कार वितरण सोहळा

मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील... रवींद्र साठे

आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात ‘एमटीडीसी’चे दालन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 17, 2023
402 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य

मुंबई l महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी ७ ते ९ मार्च, २०२३ या कालावधीत प्रतिष्ठित आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला. परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग आयटी बी बर्लिन व्यापार मेळावा २०२३ मध्ये सहभागी झाले.

महाराष्ट्र पर्यटन पॅव्हेलियनचे औपचारिक उद्घाटन भारत पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग आणि भारताचे जर्मनी येथील राजदूत पार्वथनेनी हरीशजी यांच्या हस्ते झाले.

यावर्षी आय टी बी बर्लिन व्यापार मेळाव्यामध्ये जवळ जवळ १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी महाराष्ट्र राज्याची वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली. दीर्घ काळापासून प्रवास आणि पर्यटन परिसंस्थेतील व्यवसायासाठी हा मेळावा उत्प्रेरक ठरला आहे.

आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने एक सुसज्ज पॅव्हेलियन उभारले होते. या वर्षी महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहप्रदर्शकांना भागधारकांची भेट घेता यावी यासाठी ८३ चौ. मी. इतक्या आकाराचे प्रशस्त व लक्षवेधी दालन उभारले होते तसेच दर्शकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र पर्यटन विभागाबरोबरच अनेक सह-प्रदर्शक देखील या मेळाव्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खासगी ट्रॅव्हल्स ट्रेडच्या प्रतिनिधींमध्ये फाजलानी नेचर नेस्ट, गोवर्धन इको व्हिलेज बॉलीवुड पार्क, कॅप्टन निलेश हॉलिडेज, एबिक्स ट्रॅव्हल अँड हॉलिडेज लिमिटेड (डेक्कन ओडिसी), नमस्ते टूर्स प्रा. लि., स्वदेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि वीणा वर्ल्ड अशा पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था सामील झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि अधिकारी मानसी कोठारे यांनी परिश्रम घेतले.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmtdcMtdc resorts
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In