Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव

राज्यात २५५० चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ - वनमंत्री

जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन

भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 25, 2023
442 4
0
613
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हर्षवर्धन पवार – जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती यांचा विशेष लेख

केंद्र शासनाने संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि शेती संस्थेला यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याचा प्रस्ताव

विशेष लेख – खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.

कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान्याकडे वळण्याची गरज भासू लागली. त्यामुळेच ज्वारी, बाजरी, नाचणी या भरडधान्यांची पुन्हा मागणी वाढू लागली आहे. पाश्चिमात्य देशांमध्येही भरडधान्यांचा आहारात समावेश होऊ लागला आहे.

भरडधान्यांची पौष्टिकता उत्कृष्ट आहे. त्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. ती सावकाश व हळुवारपणे पचविली जातात. सहज पचण्याच्या गुणधर्मामुळे मधुमेह व लठ्ठपणा हे विकार असणाऱ्या लोकांना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. ज्वारी, बाजरीबरोबरच राळा, नाचणी, वरी असे भरडधान्याचे विविध प्रकार आढळतात. त्यात ग्लुटेन नसते व तंतूमय घटक, प्रथिने चांगली असतात. रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ते उपयुक्त आहेत. या गुणांमुळेच लोक पुन्हा भरडधान्याकडे वळू लागले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांना अन्नाचा पर्याय बनविणे काळाची गरज आहे.

हे लक्षात घेऊनच केंद्र शासनाने संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि शेती संस्थेला यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. तो मंजूर होऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले. हाच धागा पकडून अमरावती जिल्हा प्रशासन व कृषी विभागातर्फे दि. 1 ते 5 मार्चदरम्यान आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात भरडधान्यांचा स्वतंत्र विभागच असणार आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्याकडून सर्व विभाग व विविध संस्थांच्या माध्यमातून जय्यत पूर्वतयारी होत आहे.

भरडधान्ये मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. या पिकांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शुष्क प्रदेशात किंवा कोरडवाहू प्रदेशातही भरडधान्यांची लागवड शक्य आहे. बाजरीत सल्फरयुक्त ॲमिनो ॲसिड असल्याने लहान मुले आणि गर्भवती मातांसाठी उपयुक्त असते. नाचणीमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत सर्वांत जास्त कॅल्शिअम आहे. त्यामुळे ते वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने व ग्लुटेन नसल्यामुळे नाचणी आरोग्याला हितकारी असते. वरईमध्ये कमी कॅलरी असतात. स्थूलता कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते.

आहार साखळीत मिलेटचे स्थान परत मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मिलेटचे प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा मुख्य देश आहे. पौष्टिक तृणधान्याची खाद्यसंस्कृती येथील जुनी परंपरा आहे. कमी दरात सहज उपलब्ध होणा-या जंक फूडच्या ठिकाणी मिलेट फूड उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. त्यामुळे तृणधान्याला चांगली बाजारपेठ मिळेल. तृणधान्याच्या उत्पन्न व उत्पादन वाढीमुळे शेतक-यांनाही लाभ होईल. तृणधान्यापासून तयार केलेले पोषक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत व परदेशी बाजारातील मागणी वाढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.

यानिमित्त अमरावतीत होऊ घातलेला कृषी महोत्सव हा आपल्याला आपल्या जुन्या खाद्यपरंपरेला उजाळा देणारा आणि निरनिराळ्या भरडधान्यांचे महत्त्व पटवून देणारा ठरणार आहे.- हर्षवर्धन पवार – जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू!… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
    by Rajesh Bhagwat
    October 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोली
    by Rajesh Bhagwat
    October 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismभरड धान्य
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In