Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

जैन इरिगेशनच्या जैन हिल्सवर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौराचे आयोजन

जैन ऑटोमेशन आणि न्युट्रीकेअर मधून अचूक आणि मोजूनमापून दिलेले खतांमुळे कांद्याचे प्रति एकरी १८ ते २० टन उत्पादन घेणे शक्य

राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 12, 2023
403 5
0
560
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाविन्याचा तंत्रज्ञानात सातत्य ठेवल्यास शाश्वत उत्पादन हाती मिळू शकते, राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात सुर

बिजोउत्पादन समस्या व त्यावरील उपाय योजना यावर मंथन

जळगाव l कांदा व लसुण पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात करावयाचे प्रयत्न, फर्टीगेशन यंत्रणेतून खतांचा कार्यक्षम वापर आणि मल्चिंग पेपरसह अन्य पद्धती वापरून काटेकोर व्यवस्थापनातून वाढ मिळविणे शक्य आहे. त्यासाठी नाविन्याचा तंत्रज्ञानात सातत्य असावे. यातून शाश्वत उत्पादन हाती मिळू शकते, असा सूर जळगाव जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्राचा आज रविवारी (ता.12) दुसरा दिवस होता. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर विविध पैलू लक्षात घेवून आपले पेपर सादरीकरण व मौखिक सादरीकरण केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध विषयांवर मंथन झाले.

रविवारच्या पहिल्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख होते. राजगुरूनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी यांनी कांदा व लसूण पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर पेपर सादर केला. ते म्हणाले, खरीप, उशिराचा खरीप व रब्बीमधील कांदा पिकास अन्नद्रव्यांची वेगवेगळ्या प्रमाणात मात्रा हवी असते. त्यासंबंधी कांदा व लसूण संशोधन केंद्राने शिफारसी केल्या आहेत. कांदा बियाणे रोपण, पुर्नलागवड आणि वाढीच्या काळात हे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला हवे. पाण्यात विरखळणारी अन्नद्रव्ये व इतर माध्यमातून उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये आहेत. त्यात जमिनीची स्थिती महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.

जैन इरिगेशन सिस्टीम्सचे कृषीतज्ज्ञ डॉ. पी. सोमण यांनी कांदा पाणी व्यवस्थापनाची माहिती दिली. ते म्हणाले, सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने पीक उत्पादन वाढले आहे. पाण्याची काटकसर करणेही त्यात शक्य झाले आहे. तुषार व ठिबक सिंचन कांदा पिकासाठी लाभदायी आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील शेतकऱ्यांची केस स्टडीही त्यांनी सादर केली. सूक्ष्मसिंचन प्रणालीची वितरण क्षमता (डीस्चार्ज) किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण यातून किती पाणी दिले जाते, हे लक्षात येते. त्याच्या नोंदी असायला हव्यात. कांद्याच्या १०० दिवसांच्या काळात ५०० मिलीमीटर पाणी देणे आवश्यक आहे. अतिपाण्याचा वापर टाळण्यासाठीदेखील यंत्रणा उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.

दिल्ली येथील कृषी अनुसंधान परिषदेतील भाजीपाला विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भूपाल सिंह यांनी कांदा बिजोत्पादनातील आव्हाने याबाबत पेपर सादर केला. ते म्हणाले, कांदा बिजोत्पादनात बियाण्याची शुद्धता महत्त्वाची असते. एकाच जातीच्या किंवा वाणाचे बिजोत्पादन घेताना दोन प्रक्षेत्रातील अंतर ७०० मीटरवर हवे आहे. यामुळे बियाण्याची शुद्धता जोपासता येते. शुद्धता जोपासण्यासाठी वाण निवडही महत्त्वाची असते. आयएआरआय नवी दिल्ली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ विश्वनाथ यांनीही कांदा व लसूण बी निर्मीतीमधील आव्हाणे यावर संशोधनात्मक मार्गदर्शन केले.

या उपक्रमात बियाणे उत्पादक कंपन्यांनीची भूमिका व इतर मुद्दे त्यांनी विषद केले. ज्ञानेश्वर मदने, संदीपकुमार दत्ता, टी. एल. भुतिया, आर. लाहा, विजय महाजन, एस. एम. गावंडे, एम. एम. देशमुख, एस. आर. भोपळे, ए. डी. वराडे, बी. जे. पटले, कृषितज्ज्ञ बी. डी. जडे, ए. आर. पिंपळे, डी. एस. फाड, एस. बी. वडतकर, एन. बी. झांजड, एन. के. हिडू, गणेश चौधरी, हनुमान राम, राहुल देव, बी. एम. पांडेय, ए. पटनायक, लक्ष्मीकांत, व्ही. सुचित्रा, ए. भागवान, बी. निरजा प्रभाकर, सईड अली, बी. के. दुबे, चंदन तिवारी, पी. के. गुप्ता, अनिता कुमारी, विणा जोशी आदींनी मौखिक सादरीकरण केले. यामध्ये सेंद्रीय शेती, ड्रीप इरिगेशन, विद्रांव्य खतांचा प्रभावी वापर, खरिप कांदा उत्पादन याविषयांवर चर्चा करण्यात आले.

सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना संशोधकांना पाऊनतासाचा वेळ दिला होता. बिजोउत्पादन समस्या व त्यावरील उपाय योजना यावर मंथन झाले. कृषि निवष्ठा कंपनी बियाणे उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांनी या सत्रात सहभाग घेतला. पोस्टर स्पर्धेचा निकाल चर्चासत्राच्या समारोपावेळी जाहिर केला जाणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismOnion
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In