Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

'वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार

राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन

जैन इरिगेशनच्या जैन हिल्सवर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौराचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 12, 2023
408 4
0
566
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन हिल्सवर आंतरराष्ट्रीय कांदा व लसूण परिषद दि. ११ ते १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत

जळगाव l जैन इरिगेशनच्या जैन हिल्स वरील कृषी संशोधन विकास केंद्रावर राज्यभरातील निमंत्रीत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात राज्यभरातील व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी संशोधन आणि प्रात्याक्षिक परिक्षेत्रावर भेट देत आहेत. आपल्या कष्टाला निरीक्षणातून तंत्रज्ञानाची जोड देत आहेत. जैन हिल्सवर आंतरराष्ट्रीय कांदा व लसूण परिषद दि. ११ ते १४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

त्यापार्श्वभूमीवर दि. ५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. परिषदेच्या चार दिवस पंचक्रोषीतील निमंत्रीत शेतकऱ्यांनी जैन तंत्रज्ञान अभ्यासणे अपेक्षित आहे. जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक परिक्षेत्रावर खरिप आणि रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या ८२ प्रकारच्या विविध कांदाच्या जातींची लागवड करण्यात आली आहे. ड्रीप, मायोक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट, रेनपाईपचा सिंचनासाठी केलेला वापर, यातून बहरलेली कांदा शेती शेतकरी अभ्यासत आहेत. सौर पंपाद्वारे पाणी पुरवठा करताना विहिरीवरील उघड्या जागेचा वापर करताना शेतकऱ्याचे हित कसे साधले जाईल, हे दाखविण्यात आले आहे. जैन ऑटोमेशनद्वारे फर्टिगेशन यंत्रणा, जैन न्युट्रीकेअर यंत्रणा कशी राबविता येईल. यातून वॉटर सोल्युबल खते देऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग कृषीतज्ज्ञ सांगत आहेत. पाणी व खते हे जमिनीस न देता पिकांना दिले पाहिजे यासाठी ठिबक सिंचनाच्या वापरातून खतांची कार्यक्षमता वाढत असते असे शेतकरी समजून घेत आहेत. केळीच्या जवळपास ३४ प्रकारच्या विविध जातींचा संशोधात्मक लागवड त्याला रानटी जनावरांपासून पिक संरक्षण कसे करता येईल, याची यंत्रणाही पाहता येत आहे. ग्रॅण्डनाईनमधील निवडक १४ जातींची लागवड याठिकाणी पाहता येईल. यातून शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंतीस उतरलेली टिश्यूकल्चर जैन ग्रॅण्डनाईन केळीसह इलाकी, पूवन, बन्थल मोन्थन, नेन्द्रन, रेड बनाना या टिश्यूकल्चरचा बाग शेतकऱ्यांना अभ्यासला.

जैन स्वीट ऑरेंजच्या पाचही व्हरायटी यासह चिकू, पेरू, भगवा डाळिंब यासह अतिसघन लागवड पद्धतीने आंबा शेतीच्या फळबाग व्यवस्थापनातून समृद्धीचा मार्ग शेतकरी पाहत आहेत. अत्याधुनिक कांदा पेरणी यंत्र, कांदा काढणी यंत्र, बी लागवड यंत्र यासह कृषी उपयुक्त अवजारांची माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या व उपजाऊ जमिनीचे घटत असलेले क्षेत्र पाहता भविष्यातील शेतीउपयुक्त जमिन कमी होऊ शकते. यासाठी भविष्यातील शेती, फ्युचर फार्मिंग शेतीकरी अभ्यासत आहेत. यामध्ये भाजीपालासह औषधी वनस्पतींचे उत्पादने घेण्यासाठी भिंतीवरची शेती म्हणजे व्हर्टीकल फार्मिंग, हायड्रोपोनीक शेती म्हणजे पाण्यातील शेती, एरोपोनीक शेती म्हणजे हवेत शेती, माती विरहीत शेती, वातारवण नियंत्रीत शेती पाहुन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग मिळत आहे. अभ्यास दौरामध्ये आकाश मैदानावर शेतकरी व जैन कृषितज्ज्ञ यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र होत असते. यात बघितलेले तंत्रज्ञानाविषयी शेतकरी आपल्या शंकांचे निरसण करत आहे.

जैन टिश्यूकल्चरमध्ये ग्रॅण्ड नाईन जातीमध्ये नंबर एक असलेला जैन टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील १२५ एकर क्षेत्रात विस्तारित असलेल्या पॉलिहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये केळी व डाळिंब टिश्यूकल्चर प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग त्यानंतर सर्व जातीवंत फळबागांसाठी लागणारे रोपे, कलमे त्यात प्रामुख्याने आंबा, जैन स्वीट ऑरेंज, पेरू, सिताफळ यासह भाजीपाल्याची रोपे यात प्रामुख्याने पपई, मिरची, कांदा, टोमॅटो, सॉईललेश बटाटा यांचे प्रात्याक्षिक शेतकरी अनुभवत आहेत.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In