Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
२२ वा बालगंधर्व महोत्सव – सहगायनातुन रसिकांची तृप्ती

चित्रवेणूच्या आविष्कारासह शास्त्रीय-उपशास्त्रीय संगिताने रसिकांची मने जिंकली

विदर्भातील समृद्ध इतिहास - रितेश मो.भुयार यांचा विशेष लेख

२२ वा बालगंधर्व महोत्सव – सहगायनातुन रसिकांची तृप्ती

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 9, 2023
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालगंधर्व महोत्सवाच्या २१ आवर्तने अनूभवना-या रसिक श्रोत्यांचा गौरव

जळगाव l बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. कारण होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे. पंडीत डाॕ.राम देशपांडेंनी आपल्या गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली. ताल तीलवाड्यात बंडा ख्याल “जिया मानत नाही” व द्रुत ख्याल तिनतालात ” ननदिके बचनुवा संह न जाये ” अत्यंत दमदार पणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा “देनी देनी देनी तनन” हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या ” बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल” या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित “सूरत पिया बिन छिन बिसराये” हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला. पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या “सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव” या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत. दोघंही सत्रात सहभागी कलावंताचा सत्कार जैन इरिगेशनचे डाॕ. अनिल पाटील,
केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, वेगा केमिकल्सचे भालचंद्र पाटील, निनाद चांदोरकर, दीपिका चांदोरकर, डाॕ. अर्पणा भट यांनी केले.

मोहन वीणा, सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने समारोप
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली. १९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना “अ मिटींग बाय द रिव्हर” या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.

रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव
बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थथ्थे यांचाही सन्मान झाला.

२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ ला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७
जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले.
तसेच याच महोत्सवाची एक मैफल ‘अभंगवाणी’ च्या माध्यमातून रविवार दि.१५ जानेवारी २०२३ ला महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६.३० आयोजित करण्यात येणार असल्याची माहीत त्यांनी दिली.
सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In