Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भूमिपुत्राचा जन्म सोहळ्यात पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार

पर्यटन वाढीसाठी तज्ज्ञ व व्यावसायिकांच्या चांगल्या संकल्पनांचा उपक्रमात समावेश... पर्यटनमंत्री

पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे

भूमिपुत्राचा जन्म सोहळ्यात पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 12, 2022
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा सहभाग

वाकोद, जामनेर l वाकोदचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवणारे खऱ्या अर्थाने गाव आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे कृतिशील आचरण करणारे या गावाच्या भूमीत जन्माला आले हे गावचे भाग्य असल्याचे मत भूमिपुत्र तथा ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी भव्य ग्रंथ पालखी व वृक्षदिंडी सोहळ्यातून भूमिपुत्राचा जन्मसोहळा वाकोदकरांनी अनुभवला.

वाकोद हे श्रद्धेय भवरलाल जैन यांचे जन्मगाव. याठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी, ग्रंथ पालखी भवरलालजी जैन यांची ग्रंथसंपदा ठेऊन विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली. बैल गाडीवर भवरलाल जैन यांची प्रतिमा ठेऊन भजनी मंडळीच्या साह्याने टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून भूमिपुत्राचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला.

या अभियानात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गौराई कृषी तंत्र निकेतन व विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकोद, जैन फार्म वाकोद यांचे सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रभात फेरीचे ठिकठिकाणी रांगोळया काढून पूजा करुन स्वागत करण्यात आले. माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पोलिस पाटील संतोष देठे, शिरीन शेख यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाकोद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजच्या दिनानिमित्त गावातील नूतन व्यापारी संकुलला कर्मवीर पंढरीदादा पवार व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले तर जुन्या व्यापारी संकुलला पद्मश्री डॉ. भवरलाल जैन व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक तुकाराम जाधव व सरपंच सौ. सरला संजय सपकाळे यांच्याहस्ते झाले तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या पुस्तकात वाकोद येथील शिरीन शेख यांचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल तिचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर गुळेचा यांनी केले. प्राचार्य डी. आर. चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी किशोर इंगळे, डॉ. चौधरी, प्रकाश लुंकड, बाबुराव आस्कर, प्रमोद जैन, प्रदीप पाटील, मोहन देशमुख, अभय लोढा, बालु पांढरे, शेख मुस्ताक, मधुकर काटे, विजय भोसले, प्रमोद राऊत, अरूण पाटील, संजय धोबी शेख ईला शेख गुलाब, संदीप जैन, रमेश देठे यांच्यासह जैन फार्म चे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

पंचक्रोशितील सरपंचांचा गौरव – वाकोद येथे मिरवणूकीच्या समारोपाप्रसंगी वाकोदसह पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशनच्या वतीने मदन लाठी, वाकोद जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, तोंडापूर मंडळ अधिकारी एस. बी. तिर्थंकर, वाकोद तलाठी ज्ञानेश्वर घुरके, नितीन राठोड, रमेश छाजेड, महेश देशमूख, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंडीत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते संजय सपकाळे, संजू बनसोडे, श्रीराम पाटील, मुरलीधर शेळके, जगदीश पाटील, संजय पाटील, अनिल गायकवाड, दिलीप रदाळ, राजमल भागवत, शंकर जाधव, रामेश्वर पाटील, राजूभाऊ राजपूत यांचा शाल, श्रीफळ व ‘एक न संपणारा प्रवास ग्राम विकास’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismभूमिपुत्रमोठे भाऊ
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In