Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक ठरणार पर्यटकांचे आकर्षण

जागतिक पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वनमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार

शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक ठरणार पर्यटकांचे आकर्षण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 28, 2022
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऐतिहासीक वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पर्यटन संचालनालयानद्वारे मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक… पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे… पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील

हाफकिन संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति, तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळणार

मुंबई l मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल. या टूरची तिकिटे bookmyshow.com वर बुक करता येतील अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर २७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु करण्यात आला.हा वॉक सकाळी १०, ११ आणि दुपारी १२ वाजून 54 मिनिटांनी करण्यात आला होता.या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी याचा लाभ घेतील अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना १८९९ मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून ह्या संस्थेला ‘हाफकिन इन्स्टिटयूट” असे नाव देण्यात आले. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, “या हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचे दर्शन घडविणरे व्हिटेज फोटो गॅलरी तसेच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल.”

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा शोधत असाल,… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू! गर्द नारळी-सुपारीच्या बागा, वाळूत पाऊल… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
    by Rajesh Bhagwat
    October 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोली
    by Rajesh Bhagwat
    October 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा पुन्हा परत येतात. समुद्रकिनाऱ्यापासून फक्त… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismहाफकिन इन्स्टिट्यूट
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In