
जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट
जळगाव l “राजस्थानमध्ये जमीन व पाण्याची मुबलकता आहे त्याला जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होऊन त्यांचे उत्पन्नात वाढ करण्याची खूप मोलाची गोष्ट होऊ शकते…” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राजस्थानचे कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया यांनी दिली.
राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी, कृषी मंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री उदयलाल आंजना, राज्य मंत्री राज्य मंत्री राजेंद्रसिंह यादव, राजाखेड़ा विधानसभा मतदार संघातील आमदार रोहित बोहरा आणि राजस्थानचे प्रशासकीय अधिकारी यांनी 18 व 19 नोव्हेंबर रोजी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. जैन हिल्स येथील जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पातील फ्युचर अॅग्रीकल्चर, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक पोटॅटो उत्पादन, जैन स्वीट ऑरेंज, नियंत्रीत वातावरणात काळी मिरी उत्पादन, डाळिंब, केळी, अननस, कॉफी इत्यादीचे टिश्युकल्चर, माती विरहीत शेती, आंबा ऑर्चिड, भाऊंची सृष्टी, श्रद्धाधाम इत्यादीचा समावेश होता.
राजस्थान विधान अध्यक्ष मा. सी.पी. जोशी, कृषी व पशुसंवर्धन, मत्स्यपालन मंत्री लालचंद कटारिया व मान्यवर अतिथींचे 18 नोव्हेंबर रोजी रात्री जैन हिल्स येथे आगमन झाले. कंपनीच्यावतीने त्यांचे स्वागत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.
19 रोजी सकाळी भाऊंच्या सृष्टीला भेट दिली. यावेळी अजित जैन उपस्थित होते. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कृषीमंत्री कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव या मान्यवरांनी जैन हायटेक अॅग्री इन्स्टिट्युट अर्थात जैन उच्च कृषी तंत्रज्ञान व शेती संशोधन, विकास प्रकल्पाच्या फ्युचर फार्मिंगचे बारकाव्याने अवलोकन करून जाणून घेतले. सुरू असलेल्या शेती प्रयोगांची आस्थेने चौकशी केली. माती शिवायची भविष्यातील शेती हा प्रयोग पाहून अतिथी भारावले. जैन स्वीट ऑरेंज नर्सरी, स्वीट ऑरेंज उत्पादन क्षेत्रास त्यांनी भेट दिली. एरोपोनिक्स बटाटा प्रयोगाची देखील पाहणी केली. नियंत्रीत वातावरणात मिरी उत्पादन यशस्वीपणे करता येते हे दाखवून देणारा जैन हिल्स येथील महत्त्वाकांक्षी काळी मिरी लागवड प्रयोग सुद्धा त्यांनी पाहिला. या सर्व प्रयोग, प्रकल्पांची अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह डॉ. बी. के. यादव, के.बी. पाटील यांनी माहिती करून दिली. ‘रिसोर्स टू रुट’ ही संकल्पनेचीही मान्यवरांना ओळख करून दिली.
उत्तम शाश्वत शेती तंत्रज्ञान शिकण्याचा राजस्थानचे कृषीमंत्री कटारिया यांचा शेतकऱ्यांना सल्ला
जैन हिल्स येथे मान्यवरांची भेट सुरू असताना राजस्थानी पेहरावातील काही शेतकरी या मान्यवरांना दिसले. आपल्या राज्याचा माणूस भेटल्यावर त्या सर्व अतिथींना आनंद वाटला व सर्व राजकीय शिष्टाचार (प्रोटोकॉल) सोडून राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी कृषीमंत्री लालचंद कटारिया, सहकार मंत्री आंजना, राज्य मंत्री यादव यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. जैन इरिगेशनचे कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञान म्हणजे संजीवनी आहे. उत्तम शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान येथून शिकून घ्या. कमी पाण्यात शेती करण्यासाठी येथील ठिबक सिंचनाचा आपल्या शेतात अवलंब करा. शेतीच्या उत्पादनात राजस्थान अग्रेसर ठरला पाहिजे असा सुसंवाद त्यांनी शेतकऱ्यांशी साधला. राजस्थान राज्यातील बांसवाडा येथील सुमारे 50 शेतकरी जैन हिल्स येथील विविध शेती संशोधनाचे प्रयोग पाहण्यासाठी आलेले आहेत.
- (no title)श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार… Read more: (no title)
- गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी*.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
- लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविकमंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
- छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवासखारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
- सिद्धेश्वर मंदिर माचनूरसोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही,… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन


