Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे लवकरच ताडोबा भवन

एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून गोसीखुर्दचा विकास

अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 13, 2022
403 4
0
560
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यटन सर्किट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन क्षेत्र तयार करण्यासाठी राज्य सरकार निश्चित मदत करेल…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर l अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शनिवारी दिली. ७८२ कोटीच्या नागपूर-उमरेड चारपदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागपूर -उमरेड चार पदरी रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय राजमार्ग असणाऱ्या नागपूर -उमरेड ३५३ डी चौपदरीकरण मार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, जि.प. च्या अध्यक्षा मुक्ता विष्णू कोकडे, आमदार प्रवीण दटके, मोहन मते, राजू पारवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

७८२ कोटी खर्चाच्या जागतिक दर्जाच्या या चार पदरी रस्त्याची लांबी ४१ किलोमिटर आहे. ३ वर्षात हा रस्ता पूर्ण करण्यात आला. या रस्त्यामुळे नागपूर महानगराशी उमरेड व परिसर सुलभ,गतीशील व सुरक्षित मार्गाने जोडल्या गेले आहे. हा महामार्ग उभारताना मांगली, हळदगाव, बेलगाव, उकडवाही, वडेगाव, पांढराबोडी या अस्तित्वात असणाऱ्या सहा तलावाचे खोलीकरणही करण्यात आले. १०० किमी प्रती तास वेगाचा हा महामार्ग असून पोहरा व आम नदीवरील दोन मोठया पुलाचा यामध्ये सहभाग आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अतिशय चांगला रस्ता जनतेला मिळाला असल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. नागपूर ते मूल हा प्रवास करताना गेल्या 40 वर्षापासून या रस्त्यासोबत आपला संबंध आला आहे. त्यामुळे या रस्त्यामध्ये झालेले दर्जेदार बदल लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भाचा मोठ्या प्रमाणात विकास होत असून नागपूरच्या आजूबाजूला झालेल्या विकास कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक हब’,तयार होत आहे. समृद्धी मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर दोन अडीच वर्षातच लॉजिस्टिक कंपन्यांना जमीन देखील मिळणार नाही. इतक्या झपाट्याने या ठिकाणी विकास होईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल उद्योजकता वाढेल. यावेळी त्यांनी ब्रॉडगेज रेल्वे प्रस्तावामध्ये वनविभागाचा आलेला अडथळा दूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

अंबोरा येथे पर्यटन विकासाच्या सर्व कल्पना साकार होतील. यासाठी लवकरच राज्याच्या नियामक मंडळाकडून 200 कोटीची मान्यता घेतली जाईल. या परिसरात पर्यटन सर्किट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन क्षेत्र तयार करण्यासाठी राज्य सरकार निश्चित मदत करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या मागणीचा उल्लेख करून त्यांनी आज घोषणा न करता या संदर्भात येत्या काही दिवसात प्रत्यक्ष मी केलेली कारवाई दिसून पडेल,असे सांगितले. यापूर्वी राज्याचे नेतृत्व करताना सुद्धा शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न आपण सोडवला होता. यावेळी देखील यामध्ये लक्ष घालू असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी या रस्त्याचा शुभारंभ करताना आनंद होत असल्याचे सांगितले. सोबतच येणाऱ्या काळामध्ये कुही ते उमरेड 200 कोटींचा, उमरेड ते भिवापूर चार पदरी 51 कोटींचा तर उमरेड ते बोटीबोरी वीस कोटींचा रस्ता करण्यात येईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा आज केल्या.

‘टायगर कॅपिटल ‘, होत असलेल्या नागपूरकडे जागतिक पर्यटक आकर्षित होत आहे. या पर्यटकांना साजेसे पर्यटन केंद्र अंबोरा येथे केले जाईल. गोसेखुर्द प्रकल्पाचा जल पर्यटनासाठी कल्पकतेने वापर केला जाईल. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार या भागातील युवकांना मिळेल असे, त्यांनी सांगितले. अंभोरा येथे होणारा जो पूल आहे तो केवळ दोन जिल्हे जोडणार नाही तर जागतिक दर्जाच्या पर्यटनाला या भागाशी जोडेल, असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, आमदार राजू पारवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर तर आभार प्रदर्शन प्रशांत खोडस्कर यांनी केले.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसAugust 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाईJuly 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधीJuly 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानाJuly 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNagpur tourismअंभोरा पर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In