
गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनासाठी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी नियोजन… शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्ग l स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात नुकतीच सिंधुरत्न समृध्द योजनेबाबत आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, आयएएस अधिकारी करिष्मा नायर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी विषय वाचन केले. यावेळी सविस्तर आढावा घेताना शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले बंदरांचा विकास चांगल्या पद्धतीने करा. मोबाईल पेट्रोलपंप बंदरांच्या ठिकाणी उपलब्ध करता येतील का याबाबत माहिती घ्यावी. सोलर ड्रायर जेट्टीच्या ठिकाणी ठेवा. आपल्याला काहीतरी घडवायचं आहे, ही भावना ठेवून अधिकाऱ्यांनी कामे करावीत. गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनासाठी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी नियोजन तयार करा. किती महिलांसाठी आणि कसा रोजगार निर्माण करता येईल याचा समावेश असावा.
अधिकाऱ्यांना काही अडचण असल्यास त्याबाबत एकत्रितपणे संबंधित विभागाची बैठक मुंबई येथे घेतली जाईल. असे सांगून ते म्हणाले ज्या महिलांना प्रशिक्षण दिलय त्यांना मत्स्य विभागाने संपर्क करावा. खेकडा पालन योजनाही या जिल्ह्यात कार्यान्वित करावी. महावितरणने एक जिल्ह्याचे मॉडेल बनवावे चौपाटीवर रंगीत दिवे तर वनक्षेत्रात सौर दिवे बसवावेत.
पशुसंवर्धन विभागाने कुकूटग्राम तयार करावे. ‘स्पाईस व्हीलेज’ नावाने पर्यटनासाठी कृषी पर्यटन विकसित करावे. त्यासाठी महिनाभरात प्रकल्प प्रक्रीया सुरु करावी. काजू पासून ज्यूस कसं तयार करायचं, ते टिकवायचं कसं, याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्या. कोकम, करवंद, फणस, जांभूळ यांची लागवड वाढवावी. यासाठी संबंधित विभागांना निधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
- गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसगणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
- PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन




