Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
परशुरामच्या डोंगरमाथ्यावरील भव्य दगडी पणतीचे त्रिपुरी पौर्णिमेला होणार प्रज्वलन

सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट 2022 मध्ये पर्यटन संचालनालय सहभागी होणार

परशुरामच्या डोंगरमाथ्यावरील भव्य दगडी पणतीचे त्रिपुरी पौर्णिमेला होणार प्रज्वलन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 5, 2022
455 5
0
633
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हा VDO नक्की बघा

पुरातन पणतीमध्ये वापरले जाते १५ किलो गोडेतेल, धोतराच्या पानाची वात

पणतीच्या दीपप्रज्वलनाची प्राचीन परंपरा आजही येथे जपली जाते

भाविकांनी या दीप दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन…. जयदीप जोशी l श्री परशुराम देवस्थान

चिपळूण l श्री क्षेत्र परशुराम येथील डोंगरमाथ्यावर, सवतसडा धबधब्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणतीच्या प्रज्वलनचा कार्यक्रम त्रिपुरी पौर्णिमा, सोमवार दि .७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होत आहे. भगवान श्री परशुराम मंदिर येथून प्रज्वलित मशाल घेऊन पुढे सामूहिक दौड करत टेकडीवरील भव्य शिवकालीन पणती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

ही भव्य दीपमाळ शिवकालीन असुन जांभा दगडात कोरलेली आहे. या दिपमाळेच्या वरील बाजूस काळ्या दगडात कोरलेली भव्य पणती आहे. या पणतीचा प्रकाश चिपळूण मधून सहज पाहता येतो. या महेंद्र पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर ही दीपमाळ आहे. महेंद्र पर्वताच्या सर्वोच्य माथ्यावर असलेल्या या दीपमाळे जवळून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्रि मुख्य आणि उपरांगा असे सुंदर परिसराचे दर्शन होते.

दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावातील पायरवाडीतून पाऊलवाट आहे. ही वाट जंगलमय असून, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते. चिपळूण तालुक्यातील तसेच श्री क्षेत्र परशुराम येथील स्थानिक ग्रामस्थ असे अनेक नागरिक, ग्रामस्थ व तरुण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात.

या पणतीमध्ये १ डबा ( १५ किलो ) गोडेतेल व १ धोतर पान वातीसाठी वापरले जाते. या पणती प्रज्वलनाचे हे विसावे वर्ष असून चिपळूण शहरातील व परिसरातील भक्तगण आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने या भग्नावस्थेतील भव्य पणतीची डागडुजी करत खंडित झालेली दीपप्रज्वलनाची ही प्राचीन परंपरा आजही साजरी होत असल्याने भविकात आनंदाचे वातावरण आहे.

पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानं तर्फे या त्रिपुरारी पौर्णिमेला श्री क्षेत्र परशुराम येथील पणती च्या प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गत २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण तर्फे हि परंपरा पुनश्च सुरू करण्यात आली आहे. या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम मूर्तीच्या अंगावर पडायचा असे जुने जाणकार मंडळी सांगतात. चिपळूण शहर परिसरातून या पणती चा प्रकाश त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री सर्वत्र दिसतो.

ही प्रथा पुनश्च सुरू करणारे मुख्य शिलेदार म्हणुन परशुराम भक्त श्री. नितीनजी लोकरे हे या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी करतात. या दिपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपणाला या कार्यक्रमात सहभागी व्हावयाचे असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

  • १. श्री नितिनजी लोकरे – 8149444044
  • २. श्री शंकर कानडे – परशुराम देवस्थान – 7774021100
  • ३. श्री जयदीप जोशी – परशुराम देवस्थान – 9028989125
  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा शोधत असाल,… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू! गर्द नारळी-सुपारीच्या बागा, वाळूत पाऊल… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफरOctober 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोलीOctober 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा पुन्हा परत येतात. समुद्रकिनाऱ्यापासून फक्त… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसAugust 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Agastya Sea View Apartments, Dapoli
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismchiplunChiranjiv ParshuramIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismParshuram Temple Chiplunpedhe parshuramRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In