Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मुंबई, पुणे व औरंगाबादला जी-२० परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी

विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख होणार

वनविभागाने जिल्ह्यात इको टुरीझमस्थळे विकसित करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करावा

मुंबई, पुणे व औरंगाबादला जी-२० परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 2, 2022
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुढील वर्षी नियोजित जी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक

पुणे l पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेश कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव सोमकुवर, वैज्ञानिक अतिफ खान, आर.आर. तिवारी, व्यवस्थापक अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. या निमित्ताने भारताचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त श्री. राव यांनी यावेळी दिली.

श्री. अमितेश कुमार यावेळी म्हणाले, परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भारत, महाराष्ट्र तसेच पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करावे. देशाची प्रतिमा या परिषदेच्या आयोजनातून अधिक उंचावण्याची संधी मिळत असल्याने त्यादृष्टीने तयारी करावी.

पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, मानाचे गणपती, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात येईल. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. देश, राज्य तसेच पुणे जिल्ह्याबाबत माहितीच्या लघुचित्रफीती, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस महसूल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पर्यटन विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल, परिवहन विभाग आदींचे विभागस्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!October 26, 2026
    दापोलीतील निसर्गरम्य ‘लाडघर’ गावाला नक्की भेट द्या! कोकणातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा शोधत असाल,… Read more: लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!October 26, 2026
    कोकणचा निसर्ग आणि तिथले अथांग समुद्रकिनारे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू! गर्द नारळी-सुपारीच्या बागा, वाळूत पाऊल… Read more: कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफरOctober 7, 2026
    ‘डेक्कन ओडिसी’सोबत अनुभवता येणार मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, गोवा आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा… Read more: महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
  • आनंदी निवास, केळशी दापोलीOctober 1, 2026
    “कोकणात असा एक होमस्टे आहे… जिथे एकदा राहिल्यानंतर पर्यटक पुन्हा पुन्हा परत येतात. समुद्रकिनाऱ्यापासून फक्त… Read more: आनंदी निवास, केळशी दापोली
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसAugust 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismG20India Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In