
गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजन

जळगाव l गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय आहे. गणित आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. गणितातही सराव, साधना व सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील चंद्रहास हलाई यांनी केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाईव्ह” अंतर्गत ‘भारतीय गणिताची अद्भुत दुनिया’ विषयावरील कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संचालक राकेश रामगुंदम, प्रा. गीता धर्मपाल व डॉ अश्विन झाला, सौ. अंबिका जैन आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हलाई म्हणाले कि, आधुनिक गणितातील संकल्पना भारतीय ऋषी मुनींनी आपल्या ग्रंथातून हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या आहेत. पिंगलाचार्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, लीलावती आदींच्या ग्रंथांमधील छंद काव्याचा अभ्यास केल्यास त्याची प्रचिती येते. महावीराचार्य यांचा गणितसारसंग्रह , भास्करांचे सिद्धांत शिरोमणी, कात्यायना सुलभासूत्र, याज्ञवल्क्य यांचा शतपथब्राह्मणम् हि भारतीय गणिताची समृद्धी असल्याचे ते म्हणाले. गणितातील अनेक गमतीजमती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. गीता धर्मपाल यांनी महात्मा गांधी , गणित व शिक्षण पद्धती यातील संबंध मांडला.
कार्यशाळेतील दोन्ही सत्रात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व गणिताच्या सोप्या युक्ती हलाई यांनी विद्याथ्यांना समजावून सांगितल्या. मैथिली थत्ते, भाविक कपूर, सुकीर्ती मणियार, नेहा दसोरे व ऐश्वर्य चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. गणित विषयाची भीती गेली, गणिताबद्दल गोडी निर्माण झाली, गणित व इतिहास विषयाचा संबंध कळाला, दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी देखील गणिताचा वापर कसा करता येईल याचे शिक्षण आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मिळाले असे त्यांनी म्हटले. कार्यशाळेस रुस्तमजी इंटरनॅशनल, विवेकानंद प्रतिष्ठान, एल. एच. पाटील विद्यालय, लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क व कॉलेज ऑफ फार्मसी, मु. जे. महाविद्यालय आदींचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कस्तुरबा सभागृह गच्च भरले होते.
सूत्र संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार दीपक मिश्रा, रमीज यांनी केले. यशस्वीतेसाठी उदय महाजन यांच्यासह नितीन चोपडा, डॉ. निर्मला झाला, निलेश पाटील, अदिती त्रिवेदी, रीती साहा, निवृत्ती वाघ, राजू माळी, सुनील तायडे व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
- (no title)श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार… Read more: (no title)
- गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी*.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
- लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविकमंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
- छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवासखारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
- सिद्धेश्वर मंदिर माचनूरसोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही,… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन


