Sunday, November 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘हाऊ गांधी कम्स अलाइव्ह’ संगीत कार्यशाळा संपन्न

पंढरपूरसह देहू-आळंदीचाही होणार विकास

महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया

‘हाऊ गांधी कम्स अलाइव्ह’ संगीत कार्यशाळा संपन्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 9, 2022
399 5
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक… सुश्रूती संथानम

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

जळगाव l संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या साधनेत आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी साधता येतात असे प्रतिपादन पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या सुश्रूती संथानम यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी जयंती’ व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर कार्यशाळेत सुश्रूती संथानम बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या डीन प्रा. गीता धर्मपाल, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रशासकीय प्रमुख सौ. अंबिका जैन, बैठक फाऊंडेशनचे मंदार करंजकर, दाक्षायणी आठल्ये व पार्थ ताहाराबादकर उपस्थित होते.

संगीत, सभ्यता व भारतीय समाज याविषयावर बोलतांना सुश्रूती संथानम पुढे म्हणाल्या कि, भारतीय संगीताला दोन हजार वर्षांची परंपरा असून यादवांनी व तात्कालिक राजांनी संगीताला राजाश्रय दिला. आपल्या परंपरांवर आधारित सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. संगीत कलाकाराची ओळख असून ती स्मृतिवृद्धीचे कार्य करते. संगीत माणसांना एकत्रित आणण्याचे काम करते. समाजाने रसिक बनून संगीताचा आनंद घेत असताना जाणकारांची भूमिका साकारली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुढील सत्रात मंदार करंजकर व दाक्षायणी आठल्ये यांनी ‘संगीताचा मानवी शरीर, मन व विचारानुसार होणारा परिणाम’ यावर सादरीकरणाद्वारे समजावून सांगितले. संगीतातून निर्माण होणारी कंपने शरीरातील अंतर्गत अवयवांची मसाज करते. शरीरातील प्रत्येक अवयवांची क्षमतावाढीचे काम संगीत करते. त्यापुढच्या सत्रामध्ये गाण्यातील सौंदर्य स्पष्ट करताना त्यातील लय, सूर व ताल याचे महत्वही त्यांनी विशद केले. भारतीय संगीतात सुरांचा शोध अव्याहतपणे सुरु असून प्रत्येक कलाकाराची संगीतातून व्यक्त होण्याची पद्धती वेगवेगळी आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गीता धर्मपाल यांनी केले. संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला झाला व रीती साहा यांनी केले. कार्यक्रमास संजय हांडे, दुष्यन्त जोशी, शीला पांडे, किरण सोहोळे, दिलीप चौधरी यांचेसह मु. जे. महाविद्यालय, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, विवेकानंद प्रतिष्ठान, गोदावरी संगीत महाविद्यालय, स्वराध्याय, आराध्य व स्वरम संगीत संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही,… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain Hillskokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In