Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कधी बघितली आहे का ?  कोकणातील चिमुकल्यांची दहीहंडी ?

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा कुंभार्ली घाट

श्री दशभुज लक्ष्मीगणेशाचे कोकणातील एकमेव मंदिर

कधी बघितली आहे का ? कोकणातील चिमुकल्यांची दहीहंडी ?

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 3, 2021
519 5
0
721
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोळीसरे गावातील लक्ष्मीकेशव मंदिरात चिमुकल्यांची दहीहंडी

मुंबई पुण्यातील दहीहंडी

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी म्हटले, की आठवते ढोलताश्यांच्या गजरात ठेका धरणारी तरुणाई, रंगीबेरंगी पताकांच्या गर्दीत उंच बांधलेली दहीहंडी. लोकांची अमाप उत्साह, दहीहंडी फोडण्यासाठी विविध क्रीडा मंडळांच्या तरुणांमध्ये असलेली चुरस. एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात गोल रिंगण करत विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात
कोळीसरे गावातील श्री लक्ष्मीकेशव मंदिर

दहीहंडी फोडण्यासाठी गोवींदा पथकांचे अथक प्रयत्न

सगळ्यात खालच्या थरावर असलेल्या तरुणांच्या भरभक्कम पायांच्या आधारावरच गोविंदा दहीहंडी पर्यंत पोहोचत असतो. हंडी फोडली जात असताना आजूबाजूला असलेले भाविक पाण्याच्या मारा करत गोविंदांनी रचलेले मनोरे पाडण्याचा प्रयत्न करतात, काहीवेळा ते यशस्वीही होतात. बऱ्याचवेळा संतुलन बिघडल्यानेही मनोरा कोसळतो. पुन्हा नव्या दमाने अन्‌ दुप्पट उत्साहाने जल्लोष करत मनोरे रचत अनेक प्रयत्नातून वरच्या थरावर असलेला गोविंदा दहीहंडी फोडण्यात यशस्वी नक्कीच होतो. हंडी फोडण्यात आल्यावर एकच जल्लोष सुरू होतो. कळसावर असणारे उतरतात अन्‌ यश ज्यांच्यामुळे मिळाले त्या पायाखालच्या मानकऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचतात. हे झाले पुण्यामुंबई, किंवा इतर शहरात साजरी होणाऱ्या दहीहंडीचे चित्र.

चिमुकल्यांची दहीहंडी बघण्यासाठी खालील क्लिक करा

MAHAPARYATAN.COM च्या कॅमेरा टीमने टिपलेली ही दृश्य फक्त आपल्यासाठीच – कोकणातील चिमुकल्यांची दहीहंडी

आज आपण जाणून घेणार आहोत कोकण किनार पट्टीत रत्नगिरी जिल्ह्यात असलेल्या कोळीसरे गावातील चिमुकल्यांच्या एका दहीहंडीची माहिती. गोकुळाष्टमीच्या दिवशी कोळीसरे गावात श्री लक्ष्मी केशव मंदिराच्या आवारात आमचे चित्रीकरण सुरू असताना अचानक  दहा पंधरा चिमुकली चिमुकली मुलं जमली. त्यांनी मंदिरासमोर एका लाकडी खांबावर पोहे, कुरमुरे आणि दही-दुधाने भरलेली हंडी उभी केली. एका गोविंदाने ताशा वाजवण्याची कामगिरी घेतली. खांद्याला खांदा देणारे सवंगडी आणि एकावर एक अगदी सर्राईतपणे चढणारा चिमुकला गोविंदा यांचा उत्साह बघण्यासारखा होता. त्यांनी हंडीभोवती गोलाकार रिंगण करून “गोऽविंदा रे गोऽपाळा” हा गजर करीत फेर धरून ठेका धरण्यास सुरुवात केली. सुमारे दहा पंधरा मिनिटांच्या नृत्यानंतर तीन थरांचा मनोरा रचून एका चिमुरड्या गोविंदाने पहिल्याच प्रयत्नात ही हंडी यशस्वीरित्या फोडली. मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द आणि अमाप उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.भगवान श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गोपींच्या घरात शिरून वर टांगून ठेवलेल्या शिंकाळ्यातून लोणी खाण्यासाठी मनोरे रचायचे आणि मडकी फोडायचे, त्या स्मृतिच या खेळातून भारतभर जागविण्यात येतात.
लक्ष्मीकेशव मंदिरातील चिमुकल्यांची दहीहंडी

दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळावी

या दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न केले जात आहेत.
दहीहंडी

MAHAPARYATAN.COM

आमच्या युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
MAHAPARYATAN.COM

Tags: bhagwan shri Krishnadahi handigokulashtamigopalkrushnajanmashtamikokankokan dahihandikokan tourismkolisarekonkankrishnakrushnaMahaparyatan.commaharashtra tourismplaces to visit near Ratnagiriratangiri tourismRATNAGIRIकृष्ण गोपिकाकृष्णजन्माष्टमीकोंकण दहीहंडीगोपाळ कालागोपाळागोविंदाचिमुकल्यांची दहीहंडीजन्माष्टमीजय श्री क्रिष्णादही हंडीमहापर्यंटनमुंबईश्री कृष्ण
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In