Wednesday, August 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित

गुजरातचा सिंह लवकरच महाराष्ट्रात दिसणार

श्री चंडिका देवी l पाटणादेवी मंदिर l VIDEO

राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 28, 2022
410 4
0
569
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात मारली बाजी

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

नवी दिल्ली l महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला काल प्रदान करण्यात आले.

विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह, अतिरीक्त सचिव राकेश वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा व्दितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.

पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणा-या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ही महाराष्ट्राने मोहर उमटव‍िली आहे. पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणीचे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला.

मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत डिलक्स हॉटेलला ‘पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेस, मुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला. द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पातंर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार श्री. परांजपे यांनी स्वीकारला.

पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी -2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमाहेन गोयल यांनी स्वीकारला.पर्यटक परिवहन संचालक श्रेणी-1 मधील व्द‍ितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित ला प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाव्दारे परवाना प्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणीतंर्गत पाचगणी येथील डाला रूस्टर, होमस्टे ला उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर म्हणाले, या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल, अशी प्रतिक्रीया श्री सावळकर यांनी दिली.

  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In