Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ ‘पर्यटन सप्ताह’

पर्यटनाच्या बलस्थानांवर काम होणे गरजेचे... पर्यटन तज्ज्ञ अमिताव भट्टाचार्य

राज्यातील पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ ‘पर्यटन सप्ताह’

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 25, 2022
415 4
0
576
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा l पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा… एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे

अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित – पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद लुटता येणार

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

मुंबई l जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.

या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा, पुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित – पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, कलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसी, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging) या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच 27 सप्टेंबर 2022 रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmaharashtra tourism departmentmtdcRATNAGIRIratnagiri tourismWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In