Wednesday, September 16, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य

महाराष्ट्रात नदी महोत्सवाचे आयोजन

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 20, 2022
409 4
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन

भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटाप… पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

आरोग्य पर्यटन म्हणून उपयोगात येणाऱ्या केंद्रांचे विपणन आणि प्रचार प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे

नवी दिल्ली l महाराष्ट्र दर्जेदार आणि समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार आहे. भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आरोग्यसेवेच्या पर्यटन क्षेत्रात सतत चांगले बदल करीत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य आणि निरोगी उपचारांसाठीचे एक पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी धर्मशाला येथे आयोजित राष्ट्रीय पर्यटन परिषदेत केले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन सोमवारी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी या राष्ट्रीय परिषदेस राज्याचे पर्यटन मंत्री श्री लोढा यांच्यासह इतर 11 राज्यांच्या पर्यटन मंत्री परिषदेस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

श्री लोढा यांनी सांगितले, आरोग्य पर्यटन क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा राज्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पहिल्या पसंतीचे राज्य आहे. 4 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. 2 प्रमुख बंदरे तर 53 छोटी बंदरे आहेत. राज्यात जवळपास दीड लाख परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग आहे. शीर्ष वैद्यकीय पर्यटन स्थळांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख आहे. 500 च्या जवळपास योग केंद्र, 1400 रूग्णालय, 1 लाखाच्यावर कौशल्यपूर्ण डॉक्टर्स आहेत. 65 आयुर्वेदिक विद्यालय असल्याची माहिती श्री. लोढा यांनी परिषदेत दिली.

श्री. लोढा म्हणाले, राज्यात ऑर्थोपेडिक आणि सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी बायपास, कृत्रिम गर्भधारणा, कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, दंत प्रत्यारोपण, कर्करोग उपचार (रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इतर प्रगत तंत्रज्ञान), नेत्ररोग शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी तसेच इतर आरोग्यसेवांसाठी राज्यात अनेक नामांकित खाजगी तसेच शासकीय रूग्णालये असल्याची माहितीही श्री. लोढा यांनी यावेळी दिली.

आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण संस्था राज्यात असल्याची माहिती देत श्री. लोढा यांनी सांगितले, मुंबईत योगसंस्था, इगतपुरीला (नाशिक) निर्सग उपचार पद्धती, पुणे येथे अय्यंगार योग, गोराई (मुंबई) विपस्सना ध्यान साधना केंद्र, मिकी मेहता यांचे आरोग्य केंद्र, नागपूरला मेडीसीटी, पुणेला सुविश आरोग्य केंद्र असे राज्यातील विविध ठिकाणी विविध आरोग्याशी निगडीत संस्था असल्याची माहिती दिली.

सध्या आरोग्य पर्यटन म्हणून उपयोगात येणाऱ्या केंद्रांचे विपणन आणि प्रचार प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असल्याच्या सूचना श्री. लोढा यांनी केल्या. हे असंघटित क्षेत्र असल्याचे नोंदविले. आंतरराष्ट्रीय मानकांशी जोडले जावे, विश्वासार्हता वाढविण्याची गरज असल्याच्याही सूचना श्री. लोढा यांनी या परिषदेत केल्या.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourismआरोग्य पर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In