Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ड्रोन शेतीच्या प्रसारासाठी राज्य शासन प्रयत्नशील

चंद्रपूर येथील विसापूर बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

लम्पी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ड्रोन शेतीच्या प्रसारासाठी राज्य शासन प्रयत्नशील

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
406 5
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ड्रोन शेती तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यल्प वेळ आणि कमी खर्चात होऊ शकते फायदेशीर शेती

आठ लाख किंमत असलेल्या ड्रोनसाठी लघु मध्यम व सूक्ष्म रोजगार मंत्रालयामार्फत या प्रकल्पाला कर्ज उपलब्ध होणार… गडकरी

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

नागपूर, दि. 11 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार क्रांती घडवून आणण्याचे अभिवचन दिले आहे. महाराष्ट्र शासन यासाठी विविध क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल. तसेच ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. वनामती व अग्रो व्हिजनमार्फत आज वनामती येथील सभागृहात ‘शेतीसाठी ड्रोनचे महत्व’, एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

व्यासपीठावर केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमनी मिश्र, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, ऍग्रो व्हिजनचे सी.डी. माई, रवी बोरटकर, रमेश मानकर, डॉ. गोरंटीवार, श्रीधरराव ठाकरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ‘ड्रोन शेती’संदर्भात राज्य शासन बँक सबसिडी, पायलट ट्रेनिंग, समूह शेती गटाला यासाठी कर्ज व्यवस्था, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातून या ‘स्टार्टअप ‘ उद्योगाला मान्यता देण्याचा मसुदा लवकरच तयार करेल. कृषी मंत्रालयाच्या या मसुद्याला राज्य शासनाची मान्यता घेऊन नवी दिल्ली येथे केंद्रीय विविध संघटनांसोबत चर्चेसाठी सादर करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी कृषीमंत्र्यांनी दिली.

यावेळी त्यांनी राज्यात एक दिवस बळीराजासोबत सुरू असलेल्या अभियानाची माहिती दिली. तसेच केंद्र शासनाप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजना तयार करण्याबाबत राज्य शासन विचार करत असून शेतकऱ्यांना कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत किमान आर्थिक गरजा पुरवता याव्या यासाठी विविध योजना कृषी विभाग मार्फत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ड्रोन शेती ‘ तंत्रज्ञान हे अतिशय उत्तम तंत्रज्ञान असून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात फायदेशीर शेती करणे आवश्यक आहे. फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा होते. ‘ड्रोन तंत्रज्ञान’ यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्यामार्फत फवारणी तसेच पिकांना आवश्यक असणारे औषधी द्रव्य देण्याची गतिशील, फायदेशीर, नेमकी प्रक्रिया करणे सहज शक्य असल्याचे उदाहरणांसह सांगितले. जगामधल्या प्रगत ‘स्प्रिंकल टेक्नॉलॉजी’चा वापर यामध्ये करण्यात आला आहे. विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आता समूह शेतीला पाठबळ मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये ड्रोन शेतीमुळे रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्र शासनाने लघु मध्यम व सूक्ष्म रोजगार मंत्रालयामार्फत या प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून साधारणतः आठ लाखापर्यंत किंमत असलेल्या या ‘ड्रोन ‘ ला सहज कर्ज उपलब्ध होईल व या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी यावेळी ऊसासाठी हार्वेस्टरची योजना तयार करण्यात यावी, अशी सूचना केली.

👆👆 फळ बागाईतदारांसाठी उत्पन्न वाढीसाठी नवीन झिरो बजेट पर्याय, आवडत्या फळांपासून वाईन निर्मितीचा

ड्रोन तंत्रज्ञान – देशात आज २०० च्या वर संस्थां शेती करण्यासाठी ड्रोन तयार करतात. ड्रोनद्वारे अतिशय गतीने फवारणी होते. १० मिनिटात १ एकर फवारणी होऊ शकते. त्यामुळे जिथे माणसाद्वारे एका दिवशी दोन ते तीन एकर फवारणी होते. तिथे ड्रोनद्वारे एका दिवशी दहा ते पंधरा एकर फवारणी करण्यात येते. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास औषधांचे अगदी लहान लहान थेंब तयार होतात आणि समान रूपाने झाडांच्या पानावर पडतात. त्यामुळे औषधी आणि पाणी याची बचत होते. ऊसासारख्या उंच पिकावर जिथे माणसाद्वारे फवारणी करता येते. ड्रोनद्वारे सहज फवारणी केल्यास औषधी द्रव्य अधिक प्रमाणात पर्यावरणात पसरत नाही. फवारणी करणारी माणसे हानीकारक औषध संपर्कात येत नाही. पर्यावरण संरक्षण व जीवित हानी होत नाही. शेतीला मणुष्यबळाची कमी आहे. त्यावरही हा रामबाण उपाय आहे.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismDrone farmingIndia Tourismkokankokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismड्रोन शेती
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In