Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची जयंती साजरी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध

सततचा पूर, अतिवृष्टीमुळे राज्यात ८१ लाख २ हजार हेक्टर जमीन बाधीत

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची जयंती साजरी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
401 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग – माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव l कान्हदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरीक्षक होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहारज्ञानातून माणूसकीचा मार्ग आपल्याला मिळतो, हाच माणूसकीचा मार्ग बहिणाईंच्या साहित्यात दिसतो. बहिणाई निसर्गाशी संवाद साधतात आणि पृथ्वीच्या आरशात स्वर्ग पाहतात हे तत्वज्ञान पुढील पिढीला माणुसकीला मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

जुने जळगावमधील चौधरीवाड्यातील बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, खापर पणतू देवेश चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, हर्षल पाटील, अशोक चौधरी उपस्थित होते.

सुदर्शन अय्यंगार व पद्माबाई चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करण्यात आले. यावेळी मुंबईच्या मनीषा कोल्हे, आदिती त्रिवेदी, रिती शहा, देवेंद्र पाटील यांच्यासह चौधरी वाड्यातील परिवारातील सदस्यांनी बहिणाईंना अभिवादन केले.

पुढे बोलताना सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अकबर बादशाह यांच्या काळातील कवि रहिम यांच्या साहित्याचा कवयित्री बहिणाईंच्या मायबोली ओव्यांमध्ये सारांश दिसतो. बहिणाईंच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास विद्यार्थ्यांसह उपस्थितीत साहित्यप्रेमींसमोर उदाहरणांसह मांडला.

साहित्य हे प्रवाही असते. बहिणाईंच्या साहित्यामध्ये शेतकरी महिला, तिच्या जीवनातील व्यथा दिसतात. निसर्गाशी एकरूप होऊनच आपल्याला स्वर्ग मिळतो यातूनच परमेश्वराची प्राप्ती होते. यासाठी बहिणाईंच्या ‘माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत’ या ओवींचा दाखला त्यांनी दिला. ज्ञान पुस्तकात नाही तर जीवनात आलेल्या अनुभवात, निरीक्षणातून विकसीत होत जाते अशा साहित्यातून बहिणाई या ज्ञानी, विचारवंत ठरतात असे प्रतिपादन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

अनुभूती निवासी स्कूलचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखक, साहित्यिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे साहित्य अभ्यासले. यावेळी त्यांना मराठी शिक्षक हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

विजय जैन यांनी बहिणाईंच्या साहित्यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बहिणाईंच्या कविता सादर केला. मनपा शिक्षिका पुष्पा साळवे यांनी बहिणाईंवर स्व:लिखीत कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना ज्ञानेश्वर शेंडे यांनी केली. अशोक चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेंद्र पाटील, ललित हिवाळे, प्रशांत पाटील, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismBahinabaiIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to be visited Near Jalgaonबहिणाई स्मृती संग्रहालय
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In