स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते ध्वजारोहण
जळगाव l ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते मोठ्या सन्मानाने करण्यात आले. कंपनीचे मुख्यालय असलेल्या जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील कार्यालयासह जळगावच्या सुमारे 13 विविध ठिकाणी ठरलेल्या वेळी व ठरलेल्या मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण भारतातील फॅक्टरी, कार्यालये, विभागीय कार्यालये, डेपो इत्यादी ठिकाणी देखील भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
1942 च्या चलेजाव स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्य संग्रामातील भुमिगत चळवळीत सहभागी होऊन जे धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिले ते स्व. भगवान कंडारे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कंडारे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी येथे ध्वजारोहण झाले. यावेळी विजूभाऊ जैन व किशोर कुळकर्णी उपस्थित होते.
पोर्तुगीजांविरूद्ध लढा देत गोवा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्व. पंढरीनाथ मराठे यांच्या पत्नी श्रीमती रंभाबाई मराठे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी येथे ध्वजारोहण झाले. त्यांच्यासमवेत प्रवीण जैन व देवेंद्र पाटील होते.
गोवा मुक्ती संग्रामाचे नरवीर स्व. अजितसिंग राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना राजपूत यांच्याहस्ते महात्मा गांधी उद्यान येथे झाले. त्यांच्यासमवेत डॉ. सतीश ओसवाल व अशोक चौधरी होते. गोवा मुक्ती चळवळीत जे सक्रिय होते ते स्व. लालसिंग पवार यांच्या पत्नी श्रीमती दगूबाई पवार यांच्याहस्ते भाऊंचे उद्यान येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्यासोबत सुरेशभाऊ जैन व ज्ञानेश्वर शेंड होते.
यासोबतच ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये सेवादास दलिचंदजी ओसवाल, लिलाबाई दलिचंद ओसवाल यांच्याहस्ते आणि अशोक जैन, ज्योती जैन, अंबिका जैन, आरोही जैन, आत्मन, अन्मय यांच्या उपस्थितीत जैन ॲग्रीपार्क व गांधीतीर्थ येथे ध्वजारोहण केले गेले. श्रीमती शंकुतलाबाई कांतीलाल जैन यांच्याहस्ते प्लास्टिक पार्क येथे ध्वजारोहण झाले. यांच्यासमवेत कौटुंबीक सदस्य म्हणून अजित जैन, सौ. शोभना जैन, अभय जैन व अविनाश जैन होते. श्रीमती ताराबाई शिवराज जैन यांच्याहस्ते जैन फूडपार्क व एनर्जी पार्क येथे ध्वजारोहण झाले कौटुंबीक सदस्य म्हणून अनिल जैन, सौ. निशा जैन, अथांग जैन, अंकुर जैन हे उपस्थित होते.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते वाकोद येथे ध्वजारोहण झाले. त्यांच्यासमवेत अॅड. सुनील खैरनार उपस्थित होते. श्रीमती सुलभा जोशी यांच्याहस्ते टिश्यूकल्चर पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आले. कौटुंबीक सदस्य म्हणून अतुल जैन, अभेद्य जैन उपस्थित होते. डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते कांताई नेत्रालय येथे झाले व कौटुंबीक सदस्य म्हणून डॉ. भावना जैन उपस्थित होते.
कंपनीचे जुने सहकारी माणकचंदजी सांड यांच्या हस्ते कांताई बंधारा येथे ध्वजारोहण झाले व त्यांच्या समवेत गौतम देसर्डा होते. प्रा. गणपतराव पोळ यांच्याहस्ते कांताई सभागृह येथे झाले व त्यांच्यासमवेत अरविंद देशपांडे होते. तर अनुभूती निवासी स्कूल येथे प्राचार्य देबासिस दास यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,599)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)


