साताऱ्यातील निसर्गरम्य कोयना नगर या परिसराची माहिती या लेखातून देत आहोत.
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र या विभागातील एक महत्वपूर्ण जिल्हा अशी ओळख असलेला सातारा हा जिल्हा आहे. हे शहर कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले असून सोळाव्या शतकात मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. याच सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. प्राचीन देवस्थाने, ऐतिहासिक स्थळे, गड किल्ले, महाबळेश्वर/पाचगणी ही स्थळे म्हणजे पर्यटकांची आवडीची ठिकाणे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाजवळ असलेले कोयनानगर हे प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. कोयनानगर पासून दोन कि.मी.अंतरावर असलेले नेहरू गार्डन अतिशय सुंदर असून इथून कोयना धरण व जलाशयाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.नेहरू गार्डन पासून पाच कि.मी. अंतरावर बोटॅनिकल गार्डन असून सह्याद्री पर्वत रंगामधील अतिशय दुर्मिळ वनस्पती,वेली व फुलझाडे पाहायला मिळतात.
समाधानकारक पाउस झाल्याने कोयनानगर परिसरात दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. कोयना धरण आणि शिवसागर जलाशयामुळे कोयनानगरल मात्र गेल्या काही वर्षात कोयनानगर हे एक पर्यटनस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे राज्यासह देश-विदेशातील पर्यटक कोयनानगरला येऊ लागले आहेत.
कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंगसह निवास, भोजन व्यवस्था व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. अनेक पशुपक्षी यांचा मुक्त संचार या परिसरात आहे.
कोयनेच्या बाजारपेठेसह सारा परिसर पर्यटकांनी बहरून जात आहे. कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असलेलं नेहरू उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. धरणाच्या भिंतीच दर्शन, अद्ययावत उद्यान, झाडेझुडपे, खेळणी यात पर्यटक हरखून जात आहेत. कोयना धरणाच्या भूमीपूजनापासून ते धरणाची उभारणी पर्यंत सातत्याने झालेले नवनवीन प्रयोग, बीजनिर्मिती प्रकल्प, लेक टॅपिंग हे सगळे पाहण्यासाठी या उद्यानात पर्यटकांची गर्दी होत आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे कोयनेच्या बाजारपेठेतील उलाढालही वाढली आहे.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,598)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)
