Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

तुम्हाला माहिती आहे ? देशातला पहिला मॉल कुठे उभारला गेला ?

बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
404 4
0
562
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून जळगाव येथे आयोजन… श्री. विभीषण चवरे : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

मुंबई l नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली. अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० जुलै, 2022 रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे करण्यात आल्याची माहिती श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे.

मराठी माणसाच्या ह्दयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश होतो. १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीच्या “शाकुंतल” नाटकातून त्यांनी नाट्यविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून ते १९५५ पर्यंत त्यांनी रंगभूमीवर विविध स्त्री-पुरुष भूमिका करून मराठी नाटकाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. “पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल ” असे त्यांच्या बद्दल आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे.

त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे हे कलाकार आपली कला सादर करतील. तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांची असेल.

सदर कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत या करणार आहेत. कार्यक्रमास श्री.अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव जिल्हा आणि डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक हे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन श्री विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (9)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,623)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (12)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (29)
  • प्राचीन देवस्थाने (60)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (40)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain Hillskokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismसंभाजी नाट्यगृह जळगाव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In