Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महात्मा गांधीजींच्या विचारांमध्येच वैश्विक शांतता – डॉ. अनिल काकोडकर

यावर्षीचे गणेशोत्सव, दहीहंडी सण निर्बंधमुक्त

स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धा

गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
404 4
0
561
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा

५ हजार पैकी १३० विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रमात वेगवेगळी पदके देऊन सन्मान

बंगलोर l राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. वुडी कृष्णा यांनी केले. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक डाॅ. गांधी पी.सी कझा, गांधी रिसर्च फौंडेशनचे परीक्षा समन्वयक गिरीश कुळकर्णी, कर्नाटक गांधी स्मारक निधीचे उपाध्यक्ष प्रा. जी. बी. शिवराज, एन. आर. विष्णू कुमार, स्टिफन गौडा, कर्नाटक परिक्षा समन्वयक डाॅ. अबिदा बेगम व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय समारोपात डाॅ. कृष्णा यांनी गांधी विचारांची पंचसुत्री स्विकारल्यास चारित्र्य निर्मिती सहज शक्य असल्याचे सांगितले. द्वेषाची परतफेड प्रेमाने करा, अस्पृश्यांना सामावून घ्या, माफी न मागणार्यांनाही क्षमा करा, चुक करणे गैर नाही मात्र पुन्हा ती चुक करु नका व ढोंगीपणाशिवाय साधे रहा हि पंचसुत्री त्यांनी सांगितली. पिंपळाच्या झाडाला पाणी घालुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगतात डाॅ. गांधी म्हणाले कि, जीवनात अंतिम लक्षाचा विचार करीत असतांना त्यासाठी वापरल्या जाणार्या माध्यमाचाही विचार करा. प्रत्येक युवकाने गांधी वाचले पाहिजे, समजले पाहिजे. केवळ बनावट माहितीच्या आधारावर टिका टिपण्णी करु नये.

कर्नाटक राज्याच्या सात जिल्ह्यातील २३ संस्थांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी गांधी विचार संस्कार परीक्षा दिली. १३० विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात वेगवेगळी पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

गिरीश कुळकर्णी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेची माहिती दिली. उपाध्यक्ष शिवराज यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डाॅ. अबिदा बेगम यांनी परिक्षेचा निकाल घोषित केला तर स्थानिक समन्वयक लोकेश यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गांधी भवनच्या महादेव देसाई सभागृहात समन्वयक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
Tags: agro tourismGandhi teerthIndia Tourismkokan tourismkonkanmaharashtra tourismMahatma Gandhiratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In