Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पावसाळी डेस्टिनेशन – टकमक किल्ला

लक्ष्मी विलास पॅलेस येथिल वास्तू संग्रहालय पर्यटकांसाठी खुले

जव्हार - मस्त पावसाळी डेस्टिनेशन

पावसाळी डेस्टिनेशन – टकमक किल्ला

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
410 4
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दाट जंगलाने वेढलेल्या दुर्गमस्थानी या टकमक किल्ल्याची १२व्या शतकात निर्मिति झाल्याचा इतिहास

Mahaparyatan l ठाणे (Thane) जिल्ह्यातील वसई (Vasai) तालुक्यात सकवार गावाच्या मागे टकमक किल्ला (Takmak Fort) आपल्या अंगाखांद्यावर पुरातन अवशेष बाळगत आजही उभा आहे. गडाचा डोंगर नैसर्गिकरित्या मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा झाला आहे, तसेच गडाभोवती असलेल्या दाट जंगलाने त्याच्या दुर्गमतेत भरच टाकली आहे. अशा दुर्गम स्थानी १२व्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली.

काय पहाल ? सकवार गावातून आपल्याला टकमक गडाचे दक्षिण टोक , त्याच्यापुढे उजव्या बाजूस’घोडा किंवा खुट्टा’ नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका व त्यापुढे पसरलेल्या पठार व डोंगराची धार दिसते. डोंगराच्या धारेवरून आपण पठारावर पोहोचतो. पुढे घोड्याला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदीवरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. घोड्याच्या पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात.

टकमक गड दक्षिणोत्तर पसरला आहे. पश्चिमेकडील तटबंदीवरून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची वाट गडाच्या दक्षिण टोकाकडे जाते. हेच टोक पायथ्याच्या सकवार गावातून आपल्याला दिसत असते. या टोकावरून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वीच्या काळी येथे टेहळणीची चौकी असावी. टाक्यांच्या समोरच्या बाजूस खाली उतरणाऱ्या पायवाटेने जाताना दोनही बाजूंना वास्तूंचे चौथरे कारवीच्या दाट झुडपात लपलेले दिसतात. पुढे पायवाटेला उजव्या बाजूला फाटा फुटतो. येथे दोन बांगडी तोफा पाहायला मिळतात.

टकमक गडाचा हा भाग पाहून पुन्हा मुख्य पायवाटेपाशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च पठारावर जाताना उजव्या बाजूला पाण्याचे एक टाक दिसते, टकमक गडावरून दक्षिणेला कामण गडाची डोंगररांग दिसते, पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते तर, पुर्वेला वांदरी तलाव दिसतो.

येथे कसे जायचे lll

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर (हायवे) मुंबईपासून ८४ किमी अंतरावर सकवार गावाचा फाटा आहे. या फाट्यावर वाघाड गुरुकुल, सकवार असा मोठा फलक लावलेला आहे. महामार्गावरून उजवीकडे वळून ५०० मीटर अंतरावर सकवार हे टकमक गडाच्या पायथ्याचे गाव आहे. पठारावरून चढ-उतार पार करत उघड्या माळावरून एका तासात ‘घोड्या’ पर्यंत पोहोचतो.

पुढे ‘घोड्या’ला वळसा घालून वर चढत जाऊन पश्चिमेकडील तटबंदीवरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. सकवार गावातून टकमक गडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. सकवार गावात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील वसई किंवा विरार स्थानकात उतरावे, येथून ६ आसनी शेअर रिक्षाने १० किमीवरील मुंबई- अहमदाबाद महामार्ग गाठावा. महामार्गावरून सकवार गावातील ‘रामकृष्ण मठाला जाण्यासाठी ६ आसनी शेअर रिक्षा मिळतात.

साभार – पर्यटन महाराष्ट्राचे १

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Agastya Sea View Apartments, Dapoli
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismटकमक लिल्ला
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In