Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
फणसाची मूल्यवर्धित उत्पादने बनवून अर्थसंपन्न होण्यासाठी फणस प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ

कथाशीर्षक - मारुतीचे हॉवरक्राफ्ट

फणसाची मूल्यवर्धित उत्पादने बनवून अर्थसंपन्न होण्यासाठी फणस प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 18, 2022
446 4
0
619
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे रत्नागिरीत 27 मे पासून तीन दिवसीय फणस प्रक्रिया प्रशिक्षण शिबिर

योग्य नियोजन केल्यास आंबा, काजू पेक्षाही जास्त पैसे मिळवून देणार फणस….

निराशाटाळण्यासाठी कृपया आपली जागा लगेच बुक करुन प्रवेश निश्चित करा

Mahaparyatan l सिंधुदुर्ग l सध्या जागतिक पातळीवर फणसाला सुपर फूड म्हणून नावाजले जात असून फणसाच्या विविध गुणधर्मामुळे त्याचा वापर दैनंदिन आहारात करणे शक्य होत आहे. त्यामुळेच फणस प्रक्रिया व्यवसायात प्रचंड संधी असून त्याचा लाभ कोकणवासियानी घेतला पाहिजे.

सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चटर फटर खाणं, रात्रीचं जेवण, स्वीट डिश, सणासुदीचं गोड धोड, डाएट फूड अशा अनेक गोष्टींमध्ये फणसाचा वापर केला जाऊ शकतो आणि यामुळेच फणसाला सुपर फूड म्हणून संबोधले जात आहे.

कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, फणसाच्या बिया (आठळ्या) यापासून अनेक मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवता येतात आणि याचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण 27 ते 29 मे दरम्यान रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.

कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा फणस दरवर्षी अक्षरशः फेकून दिला जातो, वाया जातो. खरं तर आंबा, काजू पेक्षा जास्त आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता फणसामध्ये आहे. परंतू त्याबाबतची योग्य माहिती, जागृती नसल्याने बहुमोली आणि बहुगुणी असलेला फणस दुर्लक्षिला जात आहे.

प्रशिक्षण तपशील –

  • कोवळा फणस, कच्चा फणस आणि पिकलेला फणस यापासून बनणाऱ्या विविध प्रॉडक्टसची माहिती
  • प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे यांची माहिती
  • व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने, FSSAI लायसन्स, न्युट्रिशन व्हॅल्यू, सरकारी योजना यांची माहिती
  • पॅकिंग, स्टोरेज, किंमत ठरवणे याबाबतची माहिती
  • ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, वितरण, विक्री यांची पद्धत

फणसच का ?

  • आरोग्याच्या दृष्टीने फणस हे सर्वोत्तम फळ रोगप्रतिकारक आणि आरोग्यदायी मोठ्या प्रमाणात आणि कमी किमतीत कच्चा माल उपलब्ध खूप सारे पदार्थ तयार करता येतात
  • मूल्यवर्धित उत्पादनामुळे आर्थिक कमाई जास्त
  • या क्षेत्रात खूपच कमी व्यावसायिक असल्याने स्पर्धा कमी
  • मूल्यवर्धित उत्पादनांना वर्षभर मागणी
  • कॅन्सर, ब्लड प्रेशर, अस्थमा, नेत्र विकार, त्वचा रोगावर उपयुक्त असल्याने दैनंदिन आहारात फणसाचा वापर करता येईल
  • व्हिटॅमिन, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम यांचं प्रमाण जास्त असल्याने सुदृढ आरोग्यासाठी चांगला

फणसाची विविध मूल्यवर्धित उत्पादने

  • विविध प्रकारच्या भाज्या
  • बिर्याणी, कुर्मा, कोफ्ता, कबाब, पकोडा
  • पापड, लोणचं, शेवया, खाकरा, बिस्किट्स
  • ज्यूस, जॅम, पोळी, फ्रूट बार, चॉकलेट, केक
  • शिरा, उपमा, इडली, डोसा, समोसा
  • आइस्क्रीम, श्रीखंड, मिठाई
  • भाकरी, चपाती साठी पिठ
  • कच्चे गरे, पिकलेले गरे व त्यांची पावडर
  • आठळ्या (घोटी) व त्याची पावडर
  • तसेच अन्य खूप सारे प्रॉडक्ट्स

आंबा, काजू पेक्षाही जास्त पैसे मिळवून देणारा हा फणस आहे. या व्यवसायातील संधी हेरुन त्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन घेण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त आहे.

प्रशिक्षण संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधावा – अभिनव उद्योग प्रबोधिनी, सिंधुदुर्ग. Mob : 8767473919 – आपली सीट बुक करतांना Mahaparyatan चा संदर्भ जरूर

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismJackfruit prossesing training campkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In