Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
छ.शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांनी पारित केलेले आदेश यांच्या प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

अमरावतीच्या पर्यटनाला वडाळी तलावाच्या विकासामुळे चालना मिळेल... महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अजिंठा, वेरुळ येथे पर्यटकांकरीता सोईसुविधा उपलब्ध करुन हेलिपॅड उभारणार

छ.शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांनी पारित केलेले आदेश यांच्या प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 25, 2022
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

200 हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश

शाहू महाराजांच्या इ. स.१८९४ – ते १९२२ या २८ वर्षांच्या दैदिप्यमान राज्य कारभाराचा कालखंड या प्रदर्शनातून उलगडणार

कोल्हापूर l राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिलपासून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २३ एप्रिल रोजी शाहू मिल येथे छ.शाहू महाराजांची दुर्मिळ छायचित्रे, त्यांनी वेळोवेळी काढलेले लोकोपयोगी आदेश, आणि कायदा कागदपत्रे आदींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या हस्ते तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

शाहू मिलच्या परिसरात भरलेल्या या आगळ्या -वेगळ्या प्रदर्शनात शाहू महाराजांच्या इ. स.१८९४ – ते १९२२ या २८ वर्षांच्या दैदिप्यमान राज्य कारभाराचा कालखंड या प्रदर्शनातून शाहू प्रेमींसाठी पाहायला मिळणार आहे.या प्रदर्शनाचे खा .पवार यांनी मनःपूर्वक कौतुक करुन या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या .

यावेळी कोल्हापूर मनपाच्यावतीने शाहू मिल येथे प्रस्तावित शाहू स्मारकाचे दृष्य प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले .वस्त्रोद्योग महामंडळाकडून सदरची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर ही जागा मनपा विकसित करणार आहे.

ज्याप्रमाणे संशोधन ग्रंथ,दर्जेदार लेख कादंबऱ्यामुळे एखाद्या ऐतिहासिक चारित्र्यावर प्रकाश पडतो, तद्वत छायाचित्रांच्या माध्यमातून एखादे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे समोर येणार असून स्मृती शताब्दी पर्वानिमित्त आयोजित केलेले हे चित्रमय प्रदर्शन जनतेसाठी आदरयुक्त व आकर्षणाचा विषय ठरणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 200 हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.

या प्रदर्शनामध्ये शाहूंच्या राजकीय, सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे, शाहूंचे राज्यरोहण, कौटुंबिक, परदेश दौरा, शिकारीची तसेच शाहूकालीन इतर छायाचित्रे, यासह २८ वर्षाच्या कालखंडात शाहूंनी वेळोवेळी जनहितार्थ केलेल्या सुमारे १ लाख आदेशातील निवडक आदेश, कायदे, कागदपत्रे व इतर पत्र व्यवहार शाहू व इतिहास प्रेमींना पहावयास मिळेल.

याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आ.अरुण लाड, आ.जयंत आसगावकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा अधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, प्रदर्शनकार इंद्रजीत सावंत, वसंत मुळक , अमरजा निंबाळकर, प्रवीण गायकवाड, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदित्य कोठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
https://youtu.be/GN_vdsy505U
Tags: agro tourismMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismsharad pawarराजर्षी छत्रपती शाहू महाराज
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In