Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ब्ल्यू फ्लॅग बीच मानांकन सिंधुदुर्ग मिळवणार…

10 हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी अनुभवला एरोमॉडेलिंग शोचा थरार

वर्षाभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सबमरीन (पाणबुडी) पर्यटन सुरू होणार

ब्ल्यू फ्लॅग बीच मानांकन सिंधुदुर्ग मिळवणार…

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 29, 2022
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या  मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही 80 वरुन 10 वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे.

प्रकल्पाची माहिती – मालवण नगरपरिषदेची स्थापना दि. 1 मे 1918 मध्ये झालेली असून मालवण नगर परिषद ही क वर्ग नगरपरिषद आहे. मालवण नगरपरिषेचे क्षेत्र 6.5 चौ.किमी आहे. मालवण शहरास सुमारे 8 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मालवण शहराची लोकसंख्या 18,648(सन 2011) इतकी आहे.

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर इंडिया या  मॅगझीनने फेब्रुवारी 2022 मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांमध्ये भारतातील 9 स्थळांचा समावेश असून या मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या सुंदर जिल्ह्यातील मालवण शहर व परिसर हे एक प्रसिध्द समुद्र पर्यटनस्थळ असून येथे सिंधुदुर्ग किल्ला चिवला बीच, दांडी बीच, राजकोट, रॉक गार्डन या सोबत जवळील तारकर्ली, देवबाग, सर्जेकोट अशी मुख्य आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. मालवण येथे दरवर्षी अंदाजे 7 लाख पर्यटक भेट देत आहेत. तसेच स्कुबा डायव्हींग स्नॉर्कलिंग, पॅरासिलींग, जेट स्की, बनाना व बंपर बोट, स्पीड बोट आदी येथील प्रमुख आकर्षण आहेत. पर्यटनास व स्थानिक रोजगारास भर देण्यासाठी मालवण नगर परिषदेने मत्स्यालय व जैविविधता माहिती केंद्र प्रकल्प प्रस्तवित केलेला आहे.

नियोजित मत्स्यालय प्रकल्पापासून प्रमुख पर्यटन स्थळे:- देवबाग 10 किमी, तारकर्ली 8 किमी, सिंधुदुर्ग किल्ला 2 किमी, रॉक गार्डन, चिवला बिच, दांडी बिज-1 किमी. नियोजित प्रकल्पाकरिता उपलब्ध दळणवळणाची साधने:- मालवण बस स्थानक 1 किमी, सिंधुदुर्ग (ओरोस) रेल्वे स्टेशन 33 किमी, चिपी (वेंगुर्ले)विमानतळ 15 किमी.

नियोजित प्रकल्पाच्या जागा व मालकी संबंधित माहिती आरक्षण तपशिल, आरक्षण क्र.30 म्युनिसिपल प्लाझा, आरक्षण सर्व्हे क्रमांक भुमापन क्र. 244/4 पैकी व भूमापन क्र. 229/14 पैकी, आरक्षित क्षेत्र, 4400 चौ.मी. न. प. मालकिचे आरक्षित क्षेत्र 3285 चौ.मी. उर्वरित व भूसंपादन करणे आवश्यक असलेली क्षेत्र. आरक्षणातील उर्वरित क्षेत्र 1115 चौ.मी, पोच रस्ता क्षेत्र 1620 चौ.मी. एकुण भूसंपादन करावायचे क्षेत्र 2735 चौ.मी.

.संपादित करावयाची जागा ही खाजगी मालकीची असून, जागा मालकांनी खाजगी वाटाघाटीने जमीन नगरपरिषदेस देण्याबाबत तयार असल्याचे कळविलेले आहे. या जागेच्या भूसंपादनाकरिता आवश्यक  रक्कम रु.4.54 कोटी निधी मागणी प्रस्तावास  जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत पालकमंत्री उदयजी सामंत तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांनी मान्यता दिलेली आहे.

नियोजित मत्स्यालय प्रकल्पामधील अंतर्भुत घटक, बेसमेंट -पार्किंग 50 कार, 100 बाईक. तळमजला – मत्स्यालय, प्रवेशव्दार, तिकीट काऊंटर, मत्स्यालय अंडर वाटर टनेल, पनोरमिक पनेल, टच पूल, माहिती फलक, अंडर वाटर ट्युनल, बॅक पनेल, सिलींड्रीकल टँक, ओपन कोई पाँड. जैवविविधता माहिती केंद्र. रेस्टॉरंट 60 व्यक्ती, खुले गार्डन रेस्टॉरंट 20 व्यक्ती. पहिला मजला -प्रदर्शन व स्थानिक वस्तु विक्री केंद्र 25 विक्री केंद्र प्रति. 500 चौ.फुट. दुसरा मजला, वस्तुसंग्रहायल स्थानिक कलाकृती व कलावंत.

या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये स्थापत्य विषयक कामे, यांत्रिकी, विद्युत व पाणीपुरवठा विषयक कामे, यात्रिकी, अक्रलिक व अंतर्गत कामे जीव रक्षक यंत्रणा, अॅक्वा स्कॅपींग ई. घटक अंतर्भूत असून  प्रकल्पाची ढोबळ अंदाजपत्रक रक्कम रु. 25.86 कोटी आहे.

अपेक्षित जमा खर्च (एका वर्षाकरिता) मत्स्यालय प्रकल्पास भेट देण्याकरिता प्रवेश शुल्क  आकारण्यात येणार आहे. तसेच शॉपिंग सेंटर, मल्टीप्लेक्स भाडे, पार्किंग शुल्क यातून नगपरिषदेस भरीव उत्पन्न मिळणार आहे.

अपेक्षित जमा रक्कम. रु. 4,84,00,000,अपेक्षित खर्च रक्कम, रु.3,41,16,000, निव्वळ उत्पन्न जमा -खर्च रु.1,42,64,000. दरवर्षी उत्पन्नामधील अपेक्षित वाढ 10 टक्के.

आपल्याआवडत्या फळांची वाईन बनवा घरच्या घरी, तेही झिरो बजेट मध्ये… हा व्हिडीओ नक्की बघा

या प्रकल्पाची फलश्रुती,  नगर परिषदेच्या वार्षिंक उत्पन्नामध्ये या प्रकल्पामुळे सुमारे रक्कम रु. 1.40 ते 1.45 कोटी इतकी अपेक्षित वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 135 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. जैव विविधता  व समुद्र विद्यान याबाबत एकाच छताखाली अद्यावत माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत “मालवण नगर परिषद क्षेत्रात मत्स्यालय उभारणे” या प्रकल्पास दि.25 मार्च 2022 रोजी झालेल्या बैठकित मुख्य सचिव,अध्यक्ष उच्चाधिकार समिती, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismBlue flagIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismMalvanMalwan
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In