Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मुंबईतील डबेवाला भवनचे उद्घाटन

पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

मुंबईतील डबेवाला भवनचे उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 6, 2022
410 4
0
569
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

“मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक

कोरोना संकटात वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम डबेवाले अखंडपणे करीत असल्याने मुंबईकरांच्या विश्वासास पात्र

समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेत मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे हक्काचे डबेवाला भवन

मुंबई : बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले.

प्रवासी बोटीतून समुद्राची थरारक सफारी, पुणे मुंबईहुन पाच तासांच्या अंतरावर असलेल्या दिवेआगर गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरडखोल येथे

मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला देण्यात आली आहे. या जागेतील ‘मुंबई डबेवाला भवन’ चे उद्घाटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी उपमहापौर ॲड.सुहास वाडकर, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके आदी उपस्थित होते.

याकूबबाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरावे गुरू होते अशी माहिती स्थानिक रहिवाशी सांगतात

श्री ठाकरे म्हणाले, “मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम ते अखंडपणे करीत असल्याने मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱ्या घटकांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे. कोविडच्या काळातही विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केल्याचे सांगून आज विविध ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या असतानाही डबेवाल्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते कुठेही मागे पडणार नाहीत, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. डबेवाल्यांसाठी भवन उभारण्याच्या दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जेव्हा सुवर्ण गणेशाचा मूळ मुखवटा होता त्यावेळेस दिवेआगर गाव कसे होते, या गावाचे ऐतिहासिक महत्व काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की बघा

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचे डबेवाल्यांशी नाते जोडले गेले असल्याचे सांगितले. डबेवाल्यांसोबतच्या स्वतःच्या आठवणी सांगून डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन असावे, असा प्रस्ताव आल्यानंतर त्यास तातडीने मंजुरी दिल्याचे त्या म्हणाल्या.

या गणपतीला दाता गणेश का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा

प्रास्ताविकादरम्यान सोपान मरे यांनी डबेवाला संघटनेची माहिती दिली. डबेवाल्यांची चौथी पिढी हे काम करीत असून सुमारे दीड लाख डबे पोहोचवण्याचे काम केले जाते. २००४ मध्ये इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईत आल्यानंतर डबेवाल्यांचे केलेले कौतुक आणि २००८ मध्ये इंग्लंडच्या शाही लग्न सोहळ्यास असलेली उपस्थिती याची आठवणही त्यांनी सांगितली.

शिवकालीन विहीर, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना, या विहिरीत असलेल्या महालवजा दालनात छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या गुप्त बैठकी झाल्या असल्याची माहिती सांगणारा हा व्हिडीओ

यावेळी डबेवाल्यांच्या प्रतिकृतीचे शिल्पकार नीरज गुप्ता, लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य पुरवणाऱ्या युनायटेड वे चे उपाध्यक्ष अनिल परमार, मानधन न घेता सेवा देणारे डबेवाले संघटनेचे कायदेशीर सल्लागार रमेश मोरे, मार्गदर्शक सचिन शिवेकर यांचा श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

Tags: agro tourismIndia Tourismkonkanmaharashtra tourismडबेवाला भवन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In