Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

गुढीपाडव्याला पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्हचे आयोजन

एमटीडीसीच्या पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला दिनानिमित्त ५० टक्के विशेष सवलत

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 4, 2022
411 4
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आयोजन

दसक्कर सिस्टर्स प्रस्तुत “ताल सुरनका मेल”

जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात सोमवार दि. ७  मार्च रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता  दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात केले आहे.

या गावाची लोकसंख्या अवघी अकराशे, अंदाजे चारशे ग्रामस्थ नर्सरी व्यवसायात आहेत.

कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर जयश्री सुनील महाजन, ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ. अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ. शिल्पा किरण बेंडाळे या मान्यवरांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता झारे करणार आहेत.

अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात.

त्यांना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसक्कर यांच्याकडे तसेच जयपूर ग्वाल्हेर किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण विदुषी अलका देव मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे झाले. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत. 

सुभाष दसक्कर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, गाण्याची आवड निर्माण होत असतानाच दसक्कर भगिनींनी Vocal Harmony  या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या प्रकाराला सुरुवात केली. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी घेऊन त्यावर हा आगळावेगळा प्रयोग करणे ही त्यांची खासियत ! मूळ सुरावटीला कुठेही धक्का न लावता गीताचे बोल आणि वाद्यसंगीताच्या धूनवरदेखील आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून Vocal Harmony चे सादरीकरण त्या करतात.

त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे कौतुक संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार जसे की, पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा, पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी, तालयोगी पं सुरेशदादा तळवलकर, पं विश्वामोहन भट, पं विभव नागेशकर, पं अजय पोहनकर, पं अरविंदकुमार आझाद, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी मंजुषा पाटील तसेच सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांकडून आणि जगभरातील लाखो चोखंदळ आणि दर्दी रसिकांकडून झालेले आहे.

त्यांनी आजवर अनेक स्वरचना केल्या आहेत. त्यात मुख्यत्वेकरून बंदिशी, रागमाला, तराणे, प्रार्थना, देशभक्तीपर गीते अशा अनेक रचनांचा समावेश आहे. नुकतीच त्यांनी “ताल सुरनका मेल” या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यातील शब्द, संगीत, गायन, वादन, संयोजन हे सगळे त्यांचेच असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हा नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक प्रकार आजवर संगीतक्षेत्रात कुठेही झाला नाही, असे अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये वसंतोत्सव पारनेर , सुश्री सीता पवार महोत्सव खंडवा , बालगंधर्व महोत्सव जळगाव , वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर , निनादिनी संगीत महोत्सव गोवा , देवगांधार संगीत महोत्सव , गोपीकृष्ण संगीत महोत्सव, नाशिक, नवदुर्गा पुरस्कार मुंबई, आदि अनेक ठिकाणी व मुंबई आकाशवाणी, रेड एफएम, माय एफएम अशा रेडिओ वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत व त्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. तसेच ABP माझा , झी युवा , झी 24 तास , कलर्स मराठी या चॅनेल्सवरुन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. शक्ती पुरस्कार, ज्ञानगंगा पुरस्कार , रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल म्युझिक अवॉर्ड, नाशिकचा लावण्यवती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांनासन्मानित केले गेले आहे.

त्यांना गायन व वादनासाठी भारत सरकारची मान्यताप्राप्त स्कॉलरशिप मिळाली आहे. तसेच त्यांनी संगीत MA पदवी आणि संगीत विशारद विशेष नैपुण्यासह प्राप्त केले आहे. लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे. लहान मुलांवर संगीत कलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे.   दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात.

चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन

Tags: agro tourismChandorkar pratishthanGandhi teerthIndia TourismJain HillskonkanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In