
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील अंबिकापूरला पर्यटन क्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा
श्री रुक्मिणी माता मंदिर निर्मिती कार्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अमरावती : विदर्भातील कौंडण्यपूरच्या रूपाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील अंबिकापूरला पर्यटन क्षेत्राला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. विदर्भाचे दैवत माता रुक्मिणीच्या कार्याचा परिचय कायम आपल्या स्मरणात रहावा, यासाठी रुक्मिणी विदर्भ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. या पावन कार्यात भरीव योगदान देऊ, असा विश्वास पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी दिला.
अंबिकापूर येथील परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज, आर्वीचे आमदार दादाराव केचे, माजी केंद्रीय मंत्री श्री. पल्लमराज, रुक्मिणी विदर्भ पिठाचे अध्यक्ष कमल किशोर जयस्वाल, सचिव गिरधरसिंग चव्हाण, कोषाध्यक्ष विजय झटाले, रवी राज आदी यावेळी उपस्थित होते.
मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व सुविधांची निर्मिती – माता रुक्मिणीच्या मंदिराची उभारणी पिठातर्फे करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 24 कोटी रुपयांचे कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. मंदिराच्या निर्मितीसह आजूबाजूचा परिसराचे सौंदर्यीकरण,भाविकांसाठी सोयी सुविधा, सभागृहे, आदींची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन