Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा संदेश

विकासाचे शाश्वत पर्यटन ‘कृषी पर्यटन’

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा..... पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा संदेश

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 14, 2022
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

स्तुत्य उपक्रम असल्याच्या प्रवाशांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

कोल्हापूर : रेल्वेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे काम उत्कृष्टपणे सुरु असून रेल्वेच्या डब्यांवर शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे,” अशा प्रतिक्रिया कोल्हापूर येथील ‘श्री शाहू महाराज टर्मिनल’ या रेल्वे स्थानकावरील ऋतुजा चोपडे यांच्यासह अन्य प्रवाशांनी व्यक्त केल्या.

राज्य शासनाने या दोन वर्षांत घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाची व लोकोपयोगी योजनांची माहिती रेल्वेच्या डब्यांवर लावण्यात आली आहे. राज्यात पाच एक्सप्रेस गाड्यांद्वारे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सरकारच्या विविध विकास कामांवर तयार करण्यात आलेल्या लोककल्याणाचा संदेश लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांद्वारे देण्यात येत आहे.

कल्याणकारी योजनांचा संदेश – राज्य शासनाच्या वतीने ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ या टॅग लाईन द्वारे लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर देण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा यात समावेश आहे.  ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हा संदेश देण्यात येत आहे.

कर्जमुक्ती.. चिंतामुक्त शेतकरी, माझी वसुंधरा, मोफत सातबारा आता दारी येणार.. ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार..  

महिला सक्षमीकरण- कुटुंबातील महिलांच्या नावे घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट, कौशल्य विकास-बेरोजगारांना रोजगार, विक्रमी लसीकरण.. कोरोनापासून संरक्षण, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना, जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण, आपद्ग्रस्तांना मदत, कापूस खरेदीसाठी मदत.. आदी अनेक निर्णय व योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRailwayratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In