Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत

डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 2, 2022
403 4
0
560
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्हा प्रशासनास सुचना

पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील

कोल्हापूर :- केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पर्यटन संचालनालयाच्या (पुणे) उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, भारत पर्यटन विभागाचे सहायक निर्देशक जितेंद्र जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. राजर्षी शाहू महोत्सव व दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा. केंद्र शासनाच्या पर्यटनच्या जवळपास 25 योजना असून यापैकी किमान 5 योजनांचा प्रस्ताव सादर करावा. पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून पर्यटनाच्या प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यासाठी सोशल मीडियामध्ये तज्‌ज्ञ असलेल्या व्यक्तींची नेमणूक करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित मुठ बांधुया व केंद्राच्या योजनांचा उपयोग पर्यटन विकासासाठी होवू शकतो याचा सर्वंकष प्रस्ताव तयार करा. तसेच जिल्ह्यातील पर्यटनाचा समावेश असलेली दिनदर्शिक काढावी. यामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून यासाठी नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनावर आधारित दिनदर्शिका काढण्यात येत असून त्याचेही लवकरच प्रकाशन करण्यात येईल.

भारत पर्यटनचे सहायक निर्देशक जितेंद्र जाधव यांनी केंद्र शासनाच्या पर्यटन विषयक योजनांची तर पर्यटन संचालनालयाच्या (पुणे) उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी राज्याच्या पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismकोल्हापूरकोल्हापूरची अंबाबाई
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In