आठवणीतले दिवेआगर…. कै. श्री. गणेश नारायण बापट

हजार वर्षात अरब, पोर्तुगीज, सिद्दी, मोगल चाच्यांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले !! दिवेआगर
सातवाह, मौर्य, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार काळातील समृद्ध नगरी म्हणून ऐतिहासिक पुरावे
दिवेआगरचा इतिहास
कोकण भटकंती करीत असतांना विविध पर्यटन/धार्मिक/ऐतिहासिक ठिकाणे/निसर्गरम्य स्थळे यांची माहिती महापर्यटन आपल्याला पर्यंत पोहचवीत असतो. अशीच भटकंतीमध्ये २०१० साली महापर्यटनची टीम दिवेआगर येथे चित्रीकरणाकरता गेली होती. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव.
तिथे दिवेआगरचे प्रतिष्ठित नागरिक श्री. गणेश नारायण बापट यांच्याशी आमचा परिचय झाला. श्री. बापट यांना गावकरी आदराने ‘दादा’ म्हणतात. कोकणाचा चालताबोलता इतिहास म्हणूनही बापटदादा ओळखले जात असल्याचे समजले. दादांना दिवेआगरचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास भूगोल अगदी तोंडपाठ. त्यांच्याशी गप्पा मारत असतांना आम्ही पोहोचलो थेट हजारो वर्षांपूर्वीच्या काळात.
कोकणाचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास दादांनी आमच्या डोळ्यांसमोर उभा केला. त्या वेळी कोकण कसं होते, कोणत्या राजवटींच्या काळात दिवेआगर गाव भरभराटीस आले, उद्ध्वस्त करण्यात आले ही सर्व माहिती त्यांनी आमच्या कॅमेऱ्यासमोर दादांनी सांगितली. माहिती देण्यासाठी सोपी पद्धत, शुद्ध उच्चार यामुळे ते सांगत असलेले प्रसंग जणू आपल्या डोळ्यांसमोरच घडत असल्याचा अनुभव आम्हाला आला. तोच अनुभव आज बारा वर्षांनंतर प्रकाशित करण्यास आम्हाला आनंद होत आहे.
