Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि दर्जेदार व्हावे

कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 9, 2022
406 5
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

सूफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली

मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायन – शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या बँन्डने सूफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. कलावंतांच्या अफलातुल स्वरांनी बालगंधर्व महोत्सवाचा मंच आज बहरुन गेला.
स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेशश्वर..’ मालकंस या रागात निबध्द गीत सादर केले यात रसिक महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले. छोटा ख्याल सादर केले. बोल होते ‘कोयलिया बोले..’

प्रसिध्दी गायीका स्व.किशोरीताई अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे शाम सुंदर राज असा मनमोहना..’ हे रूपक तालामध्ये सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद.. ‘ हे नाट्यगीत सादर केले. स्निता मिश्रा यांनी त्यांचे दादा गुरू पंडित बलवंतराव भट यांचे ‘होली होली खेलत नंदलाल’ राग आडानामध्ये सादर केले. अडाणा रागामधील तरणा ‘कान्हा दे रे’ सादर करून समारोप केला. स्निता मिश्रासोबत यशवंत वैषणची तबला साथ व मिलिंद कुलकर्णी यांची संवादिनी साथ रसिकांना मोहिनी घातली.

यंदाच्या बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मुंबई येथील कोकण कन्या बॅंड संगितकार रविराज कोलथरकर, आरती सत्यपाल, अरूंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे व विशाल सुतार यांनी काव्य किरणांची प्रभात रंगवली. पंचतुंड ही पारंपारिक नांदी वेगळ्या ढंगात सादर केली. यानंतर ‘हा झेंडा कुणा गावाचा’ रसिक श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः बिंबली. ‘आज जाने की जिद ना करो,’ ‘लग जा गले’ या हिंदी सिनेगितांसह अभंगांची मेलडीने जळगावकर रसिकांना आनंदभुती करून दिली. यानंतर ‘जिव रंगला जिव दंगला’या सिनेगीतासह भावगीत मेलडीने रसिकांवर अधिराज्य गाजविले. नाट्यगित व लक्ष्मीकांत बेर्डे लावणी मेलडी रसिकांना मोहीत करून गेली. विरसावरकरांचे ‘ने मजसी ने.. परत मातृभुमीला’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या समारोप झाला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे बालगंधर्व महोत्सवाला प्रायोजकत्व लाभले असुन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंडे, जळगाव जनता बँक चे सीईओ पुंडलिक पाटील, संचालक कृष्णा कामटे, पश्चिम क्षेत्र केंद्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर चे शशांक दंडे, जैन इरिगेशनच्यावतीने विजय महोरील,अनिल जोशी, विश्वप्रसाद भट, इंडियन आॕईलचे प्रतिनीधी सौ.किरण शिंदे, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, भारतीय जीवन विमा कंपनीचे चंद्रशेखर आगरकर, डाॕ. अर्पणा भट, दिपक चांदोरकर, दिपीका चांदोरकर यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गणेशवंदना मयुर पाटील यांनी सादर केली. वरूण देशपांडे यांनी आभार मानले.
बालगंधर्व संगीत महोत्सव-2023 ची घोषणा
स्व.वसंतराव स्मृती प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या सांगीतिक बालगंधर्व महोत्सव दि. 6, 7 व 8 जानेवारी 2023 ची महत्त्वपूर्ण घोषणा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी केली.

Tags: India TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismजळगावबालगंधर्व संगीत महोत्सव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In