Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, मारळ

गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती

श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, मारळ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 1, 2021
960 10
0
1.3k
SHARES
6.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाग / सर्पांच्या सानिध्यात असलेले जगातील एकमेव शिवलिंग

जागृत शिवलिंग

श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथील हा सुंदर व्हिडीओ नक्की पहा

व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा

कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत घनदाट आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या सुप्रसिद्ध देवस्थानाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र मार्लेश्वर  हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. इथे एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर हे नाव पडले असावे. 

Way to Marleshwar Cave

मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाट, कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्‍नागिरीहून अथवा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर मारळ हे गाव आहे.  उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तेथून एक किलोमीटरचा चढ असून साधारणपणे साडेपाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. स्वयंभू शिवपिंडी असलेल्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. 

साडेपाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते

मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे . या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा दोन स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते . मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरांजनांचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत  इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. 

निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग

शिवपिंडीच्या मागे कपारींमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व असते, मात्र या सर्पांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. भगवान शंकराचे अंगावर नाग-सर्प का असतात याची प्रचिती मार्लेश्वराच्या ठिकाणी आपल्याला नक्कीच येते. 

मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी भाविकांची वर्षभर रिघ लागलेली असते. दर सोमवार/शनिवारी , श्रावण महिना, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी येथे भाविकांचा महासागर लोटतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा हि या देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो. ‘श्री मार्लेश्वर’ हा वर तर ‘गिरजाई’ देवीस वधू समजून लग्न लावले जाते. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वर येथे  येते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. मकरसंक्रांत यात्रोत्सवाला अंदाजे दोन लाख भाविक दरवर्षी हजेरी लावतात. 

धारेश्वर धबधबा

धारेश्वर धबधबा

मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आहे. तीनही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे २०० फूट उंचीवरून पडणारा ‘धारेश्वर’ धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.  पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. शुभ्र पाण्याचा प्रपात बघितला की असे वाटते जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूपं हे धडकी भरवणारं असतं. तेथे जवळ जवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. मार्लेश्वरला गेल्यानंतर येथील धबधब्याचे दुरूनच दर्शन घेणे योग्य असून जवळ जाणे धोकादायक असल्याने पर्यटकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 

 निसर्गरम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर परिसर, मनात खूप काळ रेंगाळत राहातो. मंदिरात होणारे धार्मिक कार्य, अभिषेक तसेच देणगीसाठी श्री देव मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा.

कसे जायचे?

MahaParyatan.com

आमच्या युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMarle shelarRATNAGIRIratnagiri tourismtourism spots in ratnagiri
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In