Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र

चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 22, 2021
408 4
0
567
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘डिजिटल बेस्ट 2.0’ उपक्रमांतर्गत मायक्रो बॅंकिंग, ई-कॉमर्स ट्रेड अशा लोकोपयोगी योजना कार्यान्वित करण्यात येणार

Gandhi Teerth – Jain Hills

मुंबई : चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.

यावेळी  बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री अनिल कोकीळ, सुनिल अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर, अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.

पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, बेस्ट उपक्रम तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे. ‘पुढे चला’ हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या बेस्टचे काम अभिमानास्पद आहे. आज पर्यायी इंधनाचा विचार करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, 386 पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात असून सन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात शंभर टक्के पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे ‘डिजिटल बेस्ट 2.0’ उपक्रमांतर्गत मायक्रो बॅंकिंग, ई-कॉमर्स ट्रेड अशा विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर म्हणाले, बेस्ट पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देत आहे. दुमजली पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करताना अँपमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बटण देखील कार्यान्वित करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सर्वश्री रवी शेट्टी, सुनील जाधव,व्हिक्टर नागावकर, कृष्णा पोपेरे  या वाहतूक विभागातील अधिकारी तसेच अविनाश सापळे आणि दिनेश गारगोटे या बेस्टच्या वाहकांना सन्मानित करण्यात आले.

Tags: aditya thakreagro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismparyatan mantriमहापर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In